ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 16 सप्टेंबर : पाचोरा येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक व शिक्षिका यांनी पहिली ते पाचवीपर्यंत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना पाचोरा पोलीस स्टेशनची भेट घडवून दिली. पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी यावेळी विद्यार्थांसोबत संवाद साधला. तसेच त्यांनी पोलीस स्टेशन संदर्भातील अनेक गोष्टींबाबत माहिती दिली.
पोलीस निरीक्षकांचे मार्गदर्शन –
पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आई-वडिलांनी दिलेली शिकवण व त्यांनी दिलेला शब्द तुम्ही पाळला पाहिजे. तसेच पोलिसांबद्दल तुमच्या मनात काही भीती असेल तर ती काढून टाका पोलीस हा तुमच्या संरक्षणासाठी आहे. तुम्ही भविष्यातील जागरूक विद्यार्थी आहात. कुठेही काही घटना घडत असल्यास पोलीस स्टेशनला कळवावे. भविष्यातील तुम्ही सुद्धा देशाच्या रक्षणासाठी तुमचे भविष्य उज्वल करा.
विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला –
राहुल खताळ पुढे म्हणाले की, तुम्हाला ज्या क्षेत्रात आवड असेल त्या क्षेत्राचा अभ्यास करा व आपले आई-वडिलांचे नाव उंचवा असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विद्यार्थी व विद्यार्थिनींना अनेक प्रश्न विचारले. त्या प्रश्नावर खताळ यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले तसेच विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
पोलीस स्टेशनबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन –
निर्मल स्कूलमधील विद्यार्थ्यांना यावेळी पालोसांकडून पोलीस स्टेशन दाखवण्यात आले. तसेच पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी सर्व विद्यार्थ्यांना पोलिसांबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच पोलीस स्टेशनमधील सर्व हत्यार, पोलीस लॉकअप, पोलीस स्टेशनमधील आलेल्या नागरिकांना तक्रारी देण्यासाठी असलेले ठिकाणाबद्दल विद्यार्थ्यांना यावेळी माहिती देण्यात आली.
पोलीस अधिकारी उपस्थित –
यावेळी पाचोरा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल मोरे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वलटे, पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे, पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे व इतर पोलीस कर्मचारी तसेच निर्मल इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.