सुनिल माळी, प्रतिनिधी
पारोळा, 16 मे : शासकीय ज्वारी खरेदी योजनेअंतर्गत पारोळा शेतकरी सहकारी संघात ज्वारीची खरेदी करता ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. 15 मे पर्यंत 438 शेतकऱ्यांनी आपली नावे नोंदवली आहेत.
पारोळा तालुक्यातून 809 हेक्टर एकूण क्षेत्र ज्वारीच्या लागवडीखाली आले आहे. परंतु, पाहिजे त्या प्रमाणात, अद्याप शेतकरी ज्वारी विक्रीकरिता ऑनलाइन नोंदणी होत नाही. ही नोंदणी 31 मेपूर्वी, झाली पाहिजे. 1 त्याकरिता शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे सोबत आणावीत. त्यात ज्वारी पेरा लावलेला सात-बारा उतारा, शेतकऱ्याचे आधार कार्ड, बँक पासबुक व नोंदणीकृत मोबाइल सोबत आणायचा आहे, असे आवाहन शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन विजय सुदाम पाटील यांनी केले आहे.
बऱ्याच शेतकऱ्यांच्या सात-बारावर खरीप हंगामातील ज्वारीचा पीक पेरा लावला गेलेला नाही. कारण, त्या काळात बऱ्याच शेतकऱ्यांना ऑनलाइन पीकपेरा लावणे जमत नव्हते. नोंदणी करण्यात बरेच अडथळे निर्माण होत होते. म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी राहून गेलेली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची ज्वारी उत्पादित केलेली आहे, परंतु पीकपेऱ्यावर नाव लागलेले नाही, अशा शेतकऱ्यांसाठी पर्यायी व्यवस्था शासनाने करावी, अशी मागणी चतुर बाबुराव पाटील यांनी केलेली आहे.
हेही वाचा : Karan Pawar Interview : शिवसेना (उबाठा) उमेदवार करण पवार यांच्यासोबत विशेष संवाद.