संदीप पाटील, प्रतिनिधी
पारोळा, 30 ऑगस्ट : शेवटच्या घटकापर्यंत जनसेवा कार्याच्या प्रभावी अंमलबजावणीसह पक्षाचे संघटन अधिकाधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन कार्य करावे, असे आवाहन भाजपा विधान सभा क्षेत्र प्रमुख एरंडोल, पारोळा मतदारसंघ व मा.नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांनी संदर्भात बैठकीत केले.
भारतीय जनता पार्टी एरंडोल-पारोळा-भडगाव विधानसभा येथे राज्यसभा सदस्य मध्यप्रदेश विधानसभा प्रभारी बन्सीलाल गुजर यांच्या अध्यक्षतेखाली संघटनात्मक बैठक संपन्न झाली.
यावेळी जळगाव लोकसभेचे माजी खासदार ए.टी. पाटील, लोकसभा संयोजक डॉ.राधेश्याम चौधरी, माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा, माजी नगरसेवक मंगेश तांबे, अतुल मोरे, तालुका प्रमुख रविंद्रभोमा पाटील, शहर प्रमुख मुकुंद चौधरी, अॅड. सौ.कृतिका आफ्रे, सचिनभाऊ गुजराथी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
हेही वाचा : हिंगोलीतील तलाठी हत्येच्या निषेधार्थ पारोळा तलाठी व महसूल कर्मचारी संघटनेकडून तहसीलदार यांना निवेदन