संदीप पाटील, प्रतिनिधी
पारोळा, 13 ऑक्टोबर : पारोळा येथील श्री बालाजी मंदिरात सुरू असलेला ब्रह्मोत्सव सर्वत्र आनंदात साजरा केला जात आहे. यात अधिक भर म्हणून या वर्ष काशी येथे करण्यात येणारी गंगा आरती त्याच पद्धतीने पारोळा येथे ही आरती करण्यात येणार आहे. आज दिनांक 13 ऑक्टोबर, रविवार रोजी काशी येथील चार पुरोहितांचा समूह पारोळा येथे श्री बालाजी मारुतीचे वाहनासमोर संध्याकाळी सहा वाजता गंगा आरती करण्यात येणार आहे. दरम्यान, ही आरती 45 ते 50 मिनिटे चालणार आहे
श्री बालाजी महाराजांच्या समोर होणारी ही गंगा आरती डोळ्याची पारणे फेडणार असे होणार आहे या गंगा आरतीचे आयोजन पारोळा येथील भाविक बापू सदाशिव अँड सन्स या फॉर्मचे संचालक सदस्य राहुल किशोर शेंडे व परिवार यांनी केले आहे. दरम्यान, या आरतीत सर्व भाविकांनी सहभागी व्हावे व नवीनच सुरू करीत असलेल्या आरती उपक्रमास आपण सहयोग द्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
पारोळ्यातील रथोत्सवाची तयारी पुर्णत्वाकडे –
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री बालाजीच्या रथोत्सवाची तयारी पूर्णत्वाकडे गेली असून उद्या सोमवारी 14 ऑक्टोबर रोजी हा रथोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या रथावर शिर्डीचे फुलहारवाले सजावट करणार आहेत. याकरिता 1000 किलो फुलांचा उपयोग करण्यात येणार आहे. त्याप्रमाणे संपुर्ण विद्युत रोषणाई ही बापू नत्थू कुंभार यांच्याकडून करण्यात येणार असून रथोत्सवाची तयारी देखील पूर्णत्वास आली आहे.