• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 30, 2026
in जळगाव जिल्हा, खान्देश, जळगाव शहर, ताज्या बातम्या
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

जळगाव, 30 मे: राज्यात विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीमुळे राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. महायुतीमध्ये जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असली, तरी जळगावच्या जागेवरून मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे. ही जागा परंपरागत रित्या भाजपकडे असल्याने ती पुन्हा भाजपलाच सुटणार असल्याचे संकेत मिळताच, शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे आज 30 मे रोजी जळगावहून तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहेत.

उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मंत्री गुलाबराव पाटील मुंबईकडे रवाना –

जळगावच्या जागेबाबत अजूनही काहीच निर्णय झालेला नाहीये. जागेबाबत उद्यापर्यंत निर्णय होईल, असे अपेक्षित आहे. आता मी मुंबईला जायला निघालो असून निश्चितपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावहून मुंबईला रवाना होण्यापुर्वी पत्रकारांसोबत बोलताना सांगितले.

मुलाच्या उमेदवारीसाठी मंत्री गुलाबराव पाटील आग्रही –

जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपले पुत्र प्रतापराव पाटील यांच्यासाठी शिवसेनेकडून (शिंदे गट) जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. प्रतापराव पाटील यांनी याठिकाणी उमेदवारी मिळावी, यासाठी मंत्री गुलाबराव पाटील सुरूवातीपासूनच आग्रही असल्याचे दिसून येत आहे. मात्र, महायुतीच्या प्राथमिक जागावाटप सूत्रात जळगावची जागा भाजपने स्वतःकडेच ठेवण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेना गोटात अस्वस्थता पसरल्याचे समजते.

भाजप प्रवेशाच्या अफवांचे गुलाबराव पाटलांकडून खंडन –

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जागावाटपाचा तिढा कायम असतानाच्या राजकीय घडामोडींदरम्यान, जळगावमध्ये गुलाबराव पाटील आणि त्यांचे सुपुत्र भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र, प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी या चर्चा धुडकावून लावल्या. “मी गेली ४५ वर्षे कट्टर शिवसैनिक आहे. माझ्या निष्ठेवर कोणीही शंका घेऊ नये,” अशा शब्दांत त्यांनी या अफवांचे खंडन केले.

हेही वाचा: बळीराजाची चिंता वाढली! भारतीय हवामान विभागाकडून मान्सून हंगामाबाबतचा दुसरा सुधारित अंदाज जाहीर, ‘यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी’

बातमी शेअर करा !
Share
Tags: marathi newsminister gulabrao patilsuvarna khandesh livevidhanparishad election 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

June 13, 2026
‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

June 13, 2026
गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर आता ‘मकोका’ अंतर्गत कठोर कारवाई; अन्न व औषध प्रशासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल – मंत्री नरहरी झिरवाळ

गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर आता ‘मकोका’ अंतर्गत कठोर कारवाई; अन्न व औषध प्रशासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल – मंत्री नरहरी झिरवाळ

June 13, 2026
जळगाव विधान परिषद निवडणूक: रेश्मा काळे यांची माघार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या भेटीनंतर सुटला तिढा

जळगाव विधान परिषद निवडणूक: रेश्मा काळे यांची माघार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या भेटीनंतर सुटला तिढा

June 13, 2026
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी घेतले श्री हरिहरेश्वर मंदिराचे दर्शन; विकास व मूलभूत सुविधांबाबत आढावा

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी घेतले श्री हरिहरेश्वर मंदिराचे दर्शन; विकास व मूलभूत सुविधांबाबत आढावा

June 12, 2026
‘कृषी मित्र’ भरतीच्या नावाखालील बोगस जाहिराती; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले महत्वाचे आवाहन

‘कृषी मित्र’ भरतीच्या नावाखालील बोगस जाहिराती; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले महत्वाचे आवाहन

June 12, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page