धुळे, 9 ऑगस्ट : महाराष्ट्र शासन स्थापित धुळे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ अंतर्गत येणाऱ्या जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व सुरक्षा रक्षकांचा उद्या, 10 ऑगस्ट रोजी एक दिवसीय मेळावा व आनंदोत्सव आयोजित करण्यात आला आहे. शिवसेना धुळे महानगरच्यावतीने आयोजित केलेला हा कार्यक्रम धुळ्यातील रचना हॉल येथे पार पडणार आहे.
सुरक्षा रक्षकांसाठी मेळावा व आनंदोत्सव –
धुळे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ अंतर्गत येणाऱ्या सर्व सुरक्षा रक्षकांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाची सुरूवात ही सकाळी 9 वाजता रचना हॉल येथे होणार आहे. कार्यक्रमाच्या सुरूवातीला मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून धुळ्यातील शिवाजी महाराज पुतळा मनोहर टॉकी पासून मोटार सायकल रॅली काढण्यात येणार आहे. दरम्यान, सर्व सुरक्षा रक्षकांनी मेळाव्यात गणवेशात उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमात यांची असणार उपस्थिती –
माजी आमदार तथा सुरक्षा रक्षक मंडाळाचे मार्गदर्शक नेते शरद पाटील हे मेळाव्याचे उद्घाटक राहणार असून कार्यक्रमाची अध्यक्षस्थानी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धुळे जिल्हा संपर्कप्रमुख अशोक धात्रक राहणार आहेत. दरम्यान, एस. एन. बिरार (कामगार आयुक्त जळगाव), संजय पाटील (अध्यक्ष सुरक्षारक्षक आणि श्रम कामगार युनियन मुंबई), ए. टी. चव्हाण (वरिष्ठ लिपिक सुरक्षा रक्षक मंडळ जळगाव), देवानंद बोडरे (निरीक्षक, सुरक्षा रक्षक मंडळ धुळे), दत्तात्रेय देवागकर (शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय धुळे), निवृत्ती पवार (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, आजाद नगर पोलीस स्टेशन धुळे) यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
हेही वाचा : कामगार निरीक्षकाने मागितली लाच अन् एसीबीने पकडले रंगेहाथ; जळगावातील घटना, नेमकं काय प्रकरण?