ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 21 एप्रिल : जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांपैकी एक द्वितीयांश पदे महिलांसाठी आरक्षित करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर पाचोऱ्यातील व्यापारी भवन येथे पाचोरा तालुक्यातील 100 ग्रामपंचायतीच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग सरपंच पदाचे आरक्षण सोडत सभा तहसिलदार विजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. तसेच निश्चीत केलेल्या सरपंच पदामधुन अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नामाप्र महिला, व सर्व साधारण महिला सरपंच पद थेट व सोडतीने निश्चित करणेकरीता पाचोरा उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 02.00 वाजता सभा घेण्यात आली. यावेळी नायब तहसिलदार विनोद कुमावत यांच्यासह पाचोरा तालुक्यातील विविध गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाचोरा तालुक्यातील एकुण 100 ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण सन 2025-30 या कालावधी करीता खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेले आहे.