ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 8 ऑक्टोबर : राज्यातील नगरपरिषद, नगरपालिका तसेच नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यानंतर नगरसेवकांच्या आरक्षण उत्सुकता लागली होती. दरम्यान, पाचोरा नगरपरिषदेतर्फे आज 8 ऑक्टोबर रोजी सकाळी प्रभाग निहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, गो.से. हायस्कूलचे विद्यार्थी असलेल्या चेतन किशोर पाटील व लावण्या बबनराव पाटील या विद्यार्थ्यांच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मुख्याधिकारी मंगेश देवरे, उपमुख्याधिकारी डी. एस. मराठे, दुर्गेश सोनवणे, यांचेसह अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
पाचोरा नगरपालिकेत प्रभागवाढ; एकूण 28 नगरसेवकांची निवड होणार –
पाचोरा नगरपालिकेत यंदा एक नवीन प्रभाग वाढवण्यात आला असून एकूण प्रभागांची संख्या 14 झाली आहे. प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवक निवडून येणार असल्याने एकूण 28 नगरसेवक निवडले जाणार आहेत.
या निवडणुकीत आरक्षणाचे वाटप पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे –
- अनुसूचित जाती (SC) : एकूण 3 जागा, त्यापैकी 2 जागा महिला राखीव
- अनुसूचित जमाती (ST) : 1 जागा सामान्य (महिला किंवा पुरुष कोणीही)
- इतर मागासवर्ग (OBC) : एकूण 8 जागा, त्यापैकी 4 जागा महिला राखीव
- सामान्य प्रवर्ग (General) : एकूण 16 जागा, त्यापैकी 8 जागा महिला राखीव
अशा प्रकारे एकूण 14 जागा महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
आरक्षणाचे हे निर्धारण 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या आकड्यांच्या आधारे करण्यात आले असून, त्या वेळी पाचोरा नगरपरिषद क्षेत्राची एकूण लोकसंख्या 59,609 होती. त्यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या 5,919 आणि अनुसूचित जमातीची लोकसंख्या 2,022 इतकी होती
पाचोऱ्याचे राजकीय वातावरण तापायला सुरूवात –
प्रभागनिहाय आरक्षणाची सविस्तर यादी नगरपरिषद प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली असून, इच्छुक उमेदवार आता उमेदवारीच्या तयारीला लागले आहेत. या आरक्षणामुळे शहरातील स्थानिक राजकारणात नवी समीकरणं निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या घोषणेमुळे पाचोऱ्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. प्रमुख राजकीय पक्षांतील इच्छुकांकडून मोर्चेबांधणीला देखील सुरूवात झाल्याची माहिती समोर आली आहे.
प्रभाग निहाय आरक्षण सोडत खालीलप्रमाणे –
प्रभाग क्रमांक – 1
- अ – अनुसूचित जाती (SC) – महिला
- ब – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 2
- अ – अनुसूचित जाती (SC) – सर्वसाधारण
- ब – सर्वसाधारण – महिला
प्रभाग क्रमांक – 3
- अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) – महिला
- ब – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 4
- अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) – सर्वसाधारण
- ब – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 5
- अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) – महिला
- ब – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 6
- अ – अनुसूचित जमाती (ST) – सर्वसाधारण
- ब – सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक – 7
- अ – अनुसूचित जाती (SC) – महिला
- ब – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 8
- अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) – महिला
- ब – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 9
- अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) – सर्वसाधारण
- ब – सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक – 10
- अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) – सर्वसाधारण
- ब – सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक – 11
- अ – सर्वसाधारण – महिला
- ब – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 12
- अ– सर्वसाधारण – महिला
- ब – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 13
- अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) – महिला
- ब – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 14
- अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) – सर्वसाधारण
- ब – सर्वसाधारण – महिला