• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home क्राईम

घरफोडी प्रकरणातील कुख्यात गुन्हेगाराला पाचोरा पोलिसांनी केली अटक; एसपींनी केले अभिनंदन! नेमकं प्रकरण काय?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 14, 2025
in क्राईम, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, पाचोरा
घरफोडी प्रकरणातील कुख्यात गुन्हेगाराला पाचोरा पोलिसांनी केली अटक; एसपींनी केले अभिनंदन! नेमकं प्रकरण काय?

जळगाव, 14 फेब्रुवारी : पाचोरा शहरातील सराफ गल्लीतील राहुल विश्वनाथ चव्हाण यांच्या मालकीचे पाटील ज्वेलर्स दुकानातील घरफोडी करणाऱ्याला अटक करण्यात पाचोरा पोलिसांना यश आलंय. रणजितसंग जिवनसिंग जुन्नी (रा. राजीव गांधी नगर, जळगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून याप्रकरणातील इतर दोन संशयित आरोपी फरार आहेत.

पाचोरा पोलिसांनी गुन्ह्यातील चोरीला गेलेला 67 हजार 81 रूपयांचा किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय. दरम्यान, अटक केलेला आरोपी हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्याविरोधात तब्बल वेगवेगळ्या ठिकाणी 13 गुन्हे दाखल असल्याचे माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिलीय. दरम्यान, अटकेत असलेला आरोपी पोलीस कोठडीत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

नेमकं प्रकरण काय? –
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरातील सराफ गल्लीतील राहुल विश्वनाथ चव्हाण यांचे मालकीच्या पाटील ज्वेलर्स दुकानाचे चॅनल गेट तोडून दि. 2 फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीचे सुमारास कोणीतरी अज्ञात चोरटयांनी दुकानात प्रवेश करून दुकानातील सीसीटीव्ही कॅमे-याची तोडफोड करत तेथील डीव्हीआर व दुकानातील 68 हजार रुपयांचे सोन्या च चांदीचे दागीने घरफोडी करुन चोरुन नेले होते.
याप्रकरणी राहुल विश्वनाथ चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन पाचोरा पोलीस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत

दरम्यान, पाचोरा पोलीस स्टेशनचे निरीक्षक अशोक पवार यांनी विविध टिम तयार करत तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. यानंतर घटनास्थळी फिंगर प्रिंट तज्ञ, डॉगस्कॉडला पाचारण करत आजुबाजुचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी एक सफेद रंगाची बोलेरोतुन आरोपींनी येवुन गुन्हा करुन फरार झाल्याचे दिसुन येत होते.

सीसीटीव्ही कॅमे-यामध्ये कैद –
याबाबत जळगाव जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला सीसीटीव्ही फुटेज प्रसारीत करुन गुन्ह्याची माहिती देवून अज्ञात आरोपीतांचा शोध घेत होते. दरम्यान, दि.2 फेब्रुवारी रोजी धरणगाव पोलीस ठाणे हददीतुन एक बोलेरो वाहन चोरी झाल्याने, धरणगाव पोलीस देखील अज्ञात आरोपीतांच्या मागावर असताना दिनांक 7 फेब्रुवारी रोजी रामानंद नगर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीसांना त्यांचे हददीमध्ये अज्ञात आरोपी गुन्ह्यातील चोरलेले वाहन सोडून पळतांना सीसीटीव्ही कॅमे-यामध्ये कैद झाल्याचे दिसून आले.

‘…अन् आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली’ –
पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर, त्या वर्णनावरुन त्यातील संशयित आरोपी रणजितसिंग जिवनसिंग जुन्नी (रा. राजीव गांधी नगर, जळगाव) हा असल्याची पक्की खात्री पोलिसांना झाली. दरम्यान, रामानंद नगर पोलीसांनी दि.8 फेब्रुवारी रोजी रणजितसिंग जिवनसिंग जुन्नी यास सापळा रचुन त्यास राजीव गांधी नगर जळगाव येथून ताब्यात घेतले. यानंतर धरणगाव पोलीस ठाणेकडील दाखल गुन्ह्यात सदर आरोपीस अटक करण्यात येवुन गुन्ह्यातील बोलेरो कार क्रमांक (एमएच-19-ए एक्स-7098) जप्त करण्यात आली होती. दरम्यान, दि. 4 फेब्रुवारी रोजी खामगाव बुलढाणा येथे एटीएम फोडुन ते सदर बोलेरो मध्ये घेवुन जाण्याचा प्रयत्न केला असल्याची कबुली सदर संशयित आरोपीने दिली आहे. म्हणून सदर गुन्ह्याचा अभिलेख पडताळणी केली असता शिवाजी नगर पोलीस स्टेशन, खामगावप्रमाणे दाखल असल्याचे मिळून आले. याबाबत पाचोरा पोलीसांनी तात्काळ धरणगाव येथे जावुन तेथील अटकेतील आरोपी (रणजितसिंग जिवनसिंग जुन्नी रा. राजीव गांधी नगर, जळगाव) यास पाचोरा पोलीस ठाणेकडील गुन्ह्यात वर्ग करण्यात येवुन आरोपीकडे गुन्ह्याबाबत विचारपुस केली. प्रथमतः आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु, त्यास अधिक विश्वासात घेवुन गुन्ह्याबाबत सखोल चौकशी केली असता अटक संशयित आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.

मुद्देमाल हस्तगत –
यानंतर सदरचा गुन्हा त्याचे संशयित साथीदार सख्खा भाऊ हघुलसिंग ऊर्फ शक्तीसिंग जिवनसिंग जुन्नी (रा.राजीवगांधी नगर, जळगाव), सुवेरसिंग राजुसिंग टाक (रा. मानवत, परभणी) शेरुसिंग स्वजितसिंग बोंड (रा.बोंड, परभणी) यांचे मदतीने केल्याचे व गुन्ह्यातील मुददेमाल जळगाव येथील सोनाराकडे गहाण ठेवले बाबत आरोपीने कबुली दिली. दरम्यान, पोलीसांनी तात्काळ जळगाव येथे जावुन अटकेतील आरोपी रणजितसिंग जुन्नी याचे समक्ष घरफोडी चोरीतील सोने चांदीचे वस्तु विकलेल्या सोनाराचे दुकान दाखवुन त्याचेकडुन गुन्ह्यातील गेला माल सोन्याचांदीची लगड एकुण कि.रु. 67 हजार 81 रुपये किमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात पाचोरा पोलीसांना यश आलेले आहे. एसपींनी केले अभिनंदन –
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोपान गोरे, पोहवा राहुल शिंपी, सहा.पोलीस उपनिरीक्षक रणजित पाटील, पो.कॉ. योगेश पाटील, पो.कॉ. सागर पाटील. चापोकॉ. मजिदखान पठाण यांच्या पथकाने ही कारवाई केलीय. दरम्यान, कुख्यात गुन्हेगाराला अटक करत घरफोडाचा गुन्हा उघडकीस आणून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल एसपी डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तपास पथकातील पोलीस अधिकारी-अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon district crime newsmarathi newspachora policepachora police staionSP Maheshwar Reddysuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ट्रान्सेंड गोवा 2026’चे उद्घाटन; नव्या डिजिटल युगातील करिअरसाठी युवकांना तयार करण्याची गरज – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

‘ट्रान्सेंड गोवा 2026’चे उद्घाटन; नव्या डिजिटल युगातील करिअरसाठी युवकांना तयार करण्याची गरज – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

January 15, 2026
Video | “…तर थेट गुन्हा दाखल होणार!”, बोटावरची शाई पुसली जात असल्याचा आरोपांनंतर राज्य निवडणूक आयोगानं उचलली महत्वाची पावले

Video | “…तर थेट गुन्हा दाखल होणार!”, बोटावरची शाई पुसली जात असल्याचा आरोपांनंतर राज्य निवडणूक आयोगानं उचलली महत्वाची पावले

January 15, 2026
Jalgaon Crime : मकर संक्रांतीच्या दिवशी भररस्त्यात खून, वाचवायला आलेल्या मुलावरही हल्ला, भोलाणे येथील घटना

Jalgaon Crime : मकर संक्रांतीच्या दिवशी भररस्त्यात खून, वाचवायला आलेल्या मुलावरही हल्ला, भोलाणे येथील घटना

January 15, 2026
एनआयए, आयटीबीपी आणि बीएसएफला नवे प्रमुख; केंद्र सरकारकडून महत्त्वाच्या नियुक्त्या

एनआयए, आयटीबीपी आणि बीएसएफला नवे प्रमुख; केंद्र सरकारकडून महत्त्वाच्या नियुक्त्या

January 15, 2026
Nashik News : कुंभमेळ्यातील विकासकामांची विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडून पाहणी

Nashik News : कुंभमेळ्यातील विकासकामांची विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडून पाहणी

January 15, 2026
जळगावात सत्ता कुणाची? उद्या महापालिका निवडणुकीसाठी मतदान; किती उमेदवार अन् किती मतदार?, वाचा संपूर्ण आकडेवारी

जळगावात सत्ता कुणाची? उद्या महापालिका निवडणुकीसाठी मतदान; किती उमेदवार अन् किती मतदार?, वाचा संपूर्ण आकडेवारी

January 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page