पुणे, 17 ऑक्टोबर : केंद्रीय निवडणुक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय. या पार्श्वभूमीवर एकीकडे महायुती तसेच महाविकास आघाडीकडून जागावाटपासाठी मंथन सुरू असताना राज्यातील तिसरी आघाडी म्हणजे परिवर्तन महाशक्ती विधानसभा निवडणुकीत किती जागा लढणार, याची माहिती समोर आली आहे. पुण्यात आज परिवर्तन महाशक्तीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजू शेट्टी उपस्थित होते. दरम्यान, या बैठकीत 150 जागाबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच लवकरच इतर जागांवरचा निर्णय देखील घेण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
पुण्यात परिवर्तन महाशक्ती विधानसभेची बैठक –
महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगत असताना छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांनी एकत्रितपणे परिवर्तन महाशक्ती अशी तिसरी आघाडी उभी केलीय. दरम्यान, या परिवर्तन महाशक्तीची आज पुण्यात बैठक पार पडली. या बैठकीत 150 जागाबाबतचा निर्णय घेण्यात आला असून लवकरच इतर जागांवरचा निर्णय देखील घेण्यात येणार आहे. बरेच लोक आमच्याकडे येण्यास इच्छुक असल्याची माहिती देखील परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी दिली आहे.
परिवर्तन महाशक्ती कोणाचा होणार सहभाग? –
परिवर्तन महाशक्तीची बैठक पार पडल्यानंतर छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी 150 जागाबाबतचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली. तसेच मनोज तरंगे पाटील यांच्याशी देखील आमचे बोलणे सुरु आहे. ते आमच्या सोबत येतील असे प्रयत्न सुरु असल्याची माहिती परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी दिली आहे. तसेच महादेव जानकर देखील आमच्यासोबत येतील, असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला आहे. राजकीय घडामोडींना वेग आल्यानंतर येत्या काळात परिवर्तन महाशक्तीत कोण-कोण सहभागी होणार याचे चित्र लवकरच स्पष्ठ होणार आहे.
हेही वाचा : मोठी बातमी! महायुतीचे जागावाटप जाहीर होण्यापुर्वीच आमदार किशोर पाटील यांची फॉर्म भरण्याची तारखी ठरली