संदीप पाटील, प्रतिनिधी
पारोळा, 19 जुलै : पारोळा शहरातून मोठी बातमी समोर आली आहे. पारोळा शहरातील बालाजी शाळा परिसरात 17 जुलै बुधवारी रात्री अकरा ते साडे अकरा वाजेच्या सुमारास बिबट्याचा संचार दोन व्यक्तींनी उभा असल्याचे पाहिल्याने नवीन वसाहतधारकांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान, बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर रस्त्या लगत साधारणपणे सात ते आठ नवीन वसाहत आहेत. या वसाहतींच्या एकीकडे वंजारी रस्ता, बाजूला बायपास महामार्ग उजवीकडे अमळनेर रस्ता तर समोरून वसाहती अशा चौरसात वसाहती निर्माण झाल्या आहेत. दरम्यान, रात्रीचा काळोखाचा आश्रय घेता बिबट्याने अशोक नगर परिसरात प्रवेश केला. यावेळी याच परिसरातील दोन माणसे आपले काम आटपून घराकडे जात असताना त्यांची नजर बिबट्याकडे गेली. त्यांनी आखो देखा प्रसंग वसाहतधारकांना सांगून आपण जागृत राहावे, असे आवाहन केले.
यानंतर 18 जुलैच्या रात्री बारा ते एक वाजेच्या सुमारास बायपास लगत असलेल्या विमल सिटी परिसरात पुन्हा बिबट्याने संचार केल्यामुळे वसाहत धारकांमध्ये पुन्हा भिती निर्माण झाली. बिबट्याचा सुगावा लागताच परिसरातील म्हशींनी आरडा ओरड केली होती. दरम्यान, नवीन वसाहतीमध्ये बिबट्याच्या संचाराची घटना वाऱ्यासारखी पसरली. तारीख 18 रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी शामकांत देसले यांच्या मार्गदर्शनाखाली चोरवड हद्दीतील वनपाल वैशाली गायकवाड, वनरक्षक सुवर्णा कुंभारे यांनी बिबट्याने संचार केलेल्या घटनेची पाहणी केली. रात्रीच्या वेळी बिबट्याच्या संचार झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
वनविभागाचे आवाहन –
अमळनेर रस्त्यालगत असलेल्या बालाजी शाळा परिसरासह अशोक नगर, विमल सिटी या भागात बिबट्याने संचार केल्यामुळे नागरिकांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे रहिवासी धारकांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. दरम्यान याबाबत वनविभाग रात्रीच्या वेळी नाईट पेट्रोलिंग करून बिबट्या कडे लक्ष केंद्रित करणार आहेत. वसाहत धारकांनी याबाबत दक्ष राहून बिबट्याचा संचार होणार नाही यासाठी फटाके फोडावेत व बिबटा आढळल्यास माहिती द्यावी, असे आवाहन वनविभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा : Arun Bhatia Interview : ‘देशात भ्रष्टाचार एक धंदा’, Ex IAS अधिकारी अरुण भाटीया यांची स्फोटक मुलाखत