• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई; गुटखा-दारू जप्त; गांजा सेवन करणारा आणि सट्टा चालवणाऱ्यांवरही गुन्हे दाखल

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 5, 2026
in पाचोरा, क्राईम, ताज्या बातम्या
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई; गुटखा-दारू जप्त; गांजा सेवन करणारा आणि सट्टा चालवणाऱ्यांवरही गुन्हे दाखल

पिंपळगाव हरे.(पाचोरा), 5 एप्रिल: पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर परिसरात पोलिसांनी अवैध धंद्यांवर मोठी कारवाई करत गुटखा, दारू, गांजा आणि सट्टा व्यवसायावर एकाच वेळी धडक कारवाई केली आहे. गुप्त माहितीनुसार टाकलेल्या छाप्यात गुटखा व देशी-विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. यासोबतच गांजा सेवन करणारा आणि सट्टा चालवणाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विविध ठिकाणी समांतर कारवाई करत पोलिसांनी अवैध व्यवसायांवर लगाम घालण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केले जात आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पिंपळगाव हरे येथील माळी मंगल कार्यालयाच्या मागील एका घरात गुटखा व देशी-विदेशी दारूची विक्री सुरू असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ छापा टाकून मंगलबाई प्रदीप निकम, सिद्धांत प्रदीप निकम आणि अमित प्रदीप निकम यांच्या घरातून सुमारे ८,१६२ रुपयांचा सुगंधित तंबाखू व पानमसाला तसेच ६,२७० रुपयांची देशी-विदेशी दारू जप्त केली. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 आणि महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पिंपळगाव हरे येथील कालीका माता चौकात विजय आत्माराम जगताप हा गांजा बाळगत व सेवन करताना आढळून आला. त्याच्याविरुद्ध NDPS कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. तसेच वरखेडी येथील अशोक भिका पाटील हा देशी दारूची विक्री करताना पकडण्यात आला असून त्याच्याविरुद्धही महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याशिवाय, लोहारा दूरक्षेत्रातील कु-हाड खु. येथे पांडुरंग फकिरा तिरमल हा सट्टा चालवत असल्याचे उघडकीस आले. त्याच्यासह सट्टा चालवण्यास प्रवृत्त करणारा संदीप भाऊसाहेब पाटील (रा. कृष्णापुरी, पाचोरा) यांच्याविरुद्धही महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई –

ही सर्व कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा, पोहेकॉ अभिजित निकम, पोहेकॉ किरण ब्राम्हणे, पोहेकॉ तात्याबा नागरे, पोहेकॉ शैलेश चव्हाण, पोना राहुल बेहरे, पो.कॉ भारत पाटील, पो.कॉ नामदेव इंगळे, पोकॉ अमोल पाटील पो.कॉ शाम हटकर, मपोकों मंजु खंदारे, चा.पो.ना दिपक अहिरे यांनी केली.

हेही वाचा: रावेरमध्ये आधुनिक केळी शेती व मूल्यवर्धन प्रक्रियेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

बातमी शेअर करा !
Share
Tags: pachora takuka crime newspimpalgaon hareshwar police stationsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वर्तमान व भविष्यातील आव्हानांचा विचार करुन शैक्षणिक पद्धतीला नवी दिशा आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वर्तमान व भविष्यातील आव्हानांचा विचार करुन शैक्षणिक पद्धतीला नवी दिशा आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

April 5, 2026
पाचोऱ्यात शिवसेनेचा उद्या मेळावा; अमरावती लोकसभा संपर्कप्रमुखपदी निवड झाल्यानिमित्त आमदार किशोर आप्पा पाटील यांचा होणार सत्कार

पाचोऱ्यात शिवसेनेचा उद्या मेळावा; अमरावती लोकसभा संपर्कप्रमुखपदी निवड झाल्यानिमित्त आमदार किशोर आप्पा पाटील यांचा होणार सत्कार

April 5, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई; गुटखा-दारू जप्त; गांजा सेवन करणारा आणि सट्टा चालवणाऱ्यांवरही गुन्हे दाखल

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई; गुटखा-दारू जप्त; गांजा सेवन करणारा आणि सट्टा चालवणाऱ्यांवरही गुन्हे दाखल

April 5, 2026
Pachora News: पाचोरा तालुक्यातील पत्रकारांची बैठक संपन्न; बैठकीत विविध मुद्यांवर पार पडली चर्चा

Pachora News: पाचोरा तालुक्यातील पत्रकारांची बैठक संपन्न; बैठकीत विविध मुद्यांवर पार पडली चर्चा

April 5, 2026
किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 21 | कथा राज्यपालांना तोफांची ‘सरबत’ देण्याच्या प्रथेची!

किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 21 | कथा राज्यपालांना तोफांची ‘सरबत’ देण्याच्या प्रथेची!

April 4, 2026
VIDEO | नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली; एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून महत्वाची माहिती

VIDEO | नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली; एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून महत्वाची माहिती

April 4, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page