• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

कठीण काळात प्रजापिता ब्रह्मकुमारींनी पाठबळ दिले, वैशाली सुर्यवंशी यांचे सामनेर येथे प्रतिपादन

ब्रह्माबाबा यांच्या स्मृती दिनानिमित्त सामनेरातील केंद्रात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 19, 2024
in पाचोरा, ताज्या बातम्या
कठीण काळात प्रजापिता ब्रह्मकुमारींनी पाठबळ दिले, वैशाली सुर्यवंशी यांचे सामनेर येथे प्रतिपादन

ईसा तडवी, प्रतिनिधी
सामनेर (पाचोरा), 19 जानेवारी : माझे वडील हे प्रजापिता ब्रह्मकुमारी चळवळीत सक्रीय होते, ते गेल्यानंतरच्या अत्यंत कठीण काळात याच परिवाराने मला पाठबळ दिले, जगण्याची उमेद प्रदान केली असे प्रतिपादन शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांनी केले. त्या परमपूज्य ब्रह्मा बाबा यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.

सामनेरात स्मृती दिनानिमित्त विशेष कार्यक्रम –
सामनेर येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी केंद्रात ब्रह्मा बाबा यांच्या स्मृती दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांची उपस्थिती होती. त्यांच्यासह उपस्थिती मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमात प्रारंभ झाला. यानंतर केंद्राच्या वतीने वैशाली सुर्यवंशी यांचे स्वागत करण्यात आले.

आध्यात्मिक मार्गाचा मोठा प्रभाव –
याप्रसंगी वैशाली सुर्यवंशी यांनी आपल्या मनोगतातून आपले कुटुंब आणि प्रजापिता ब्रह्मकुमारी चळवळ यांच्यातील भावबंधावर भाष्य केले. त्या म्हणाल्या की, माझे वडील तीर्थरूप तात्यासाहेब हे या चळवळीशी जुडलेले होते. ते स्थानिक केंद्रात तर जातच होते, पण अनेकदा माऊंट आबू येथे देखील गेले होते. त्यांच्या जीवनावर या आध्यात्मिक मार्गाचा मोठा प्रभाव होता.

मला मोठा धीर दिला –
त्या पुढे म्हणाल्या की, तात्यांचे आकस्मिक निधन झाल्यानंतरच्या खडतर कालखंडात प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या स्थानिक दिदींनी मला मोठा धीर दिला. आज व्यस्त वेळापत्रकातून वेळ मिळत नसला तरी आपण नियमित ध्यान-धारणा करतो आणि आगामी काळात याला अजून जास्त वेळ देणार असल्याचे वैशालीताई सुर्यवंशी यांनी आवर्जून नमूद केले.

आपण भूमिका बजावणार –
आपण एक विचार घेऊन पुढे चाललो असून यात महिला म्हणून आपण सर्वांनी माझ्या पाठिशी भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. एखादी महिला ही अतिशय काटकसर करून देखील ज्या प्रकारे संसार करून दाखविते, अगदी त्याच प्रमाणे राजकारणात आपण भूमिका बजावणार असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

यांची होती उपस्थिती –
या कार्यक्रमालायाप्रसंगी शरद पाटील तालुकाप्रमुख, विनोद आप्पा बाविस्कर, राजूभाऊ पाटील, राजू काळे, पप्पू राजपूत, सावकार दादा, सुनील पाटील, अमरसिंग पाटील, अशोक कुमावत, मनोज पाटील, सचिन पाटील, मुन्ना अशोक पितांबर, श्रीराम ढमाले, किरण पाटील, देवा भाऊ, बापू पाटील, नितीन महाजन संजय ठाकरे अशोक महाजन एकनाथ महाराज, महान आप्पा पाटील, आनंदा पाटील, रवींद्र पोपट पाटील, कैलास पाटील, प्रवीण पाटील, हेमराज पाटील समाधान पाटील गफार भाई, अभिषेक खंडेलवाल, आणि समस्त तालुका पदाधिकारी या मान्यवरांची उपस्थिती होती.

हेही वाचा : महाराष्ट्रातही 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर, राज्य सरकारचा निर्णय

बातमी शेअर करा !
Share
Tags: Brahmakumari Samnersamnershivsena vaishali suryavanshivaishali suryawanshi

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अवघ्या 3 तासांत दोन चोरीचे गुन्हे उघड, आरोपी अटकेत

पाचोरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अवघ्या 3 तासांत दोन चोरीचे गुन्हे उघड, आरोपी अटकेत

April 17, 2026
उन्हाळ्यात पाणी व वीजपुरवठा अखंडितपणे सुरु ठेवावा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

उन्हाळ्यात पाणी व वीजपुरवठा अखंडितपणे सुरु ठेवावा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

April 17, 2026
‘मतदार यादी ही राजकीय आयुष्याची शिदोरी’; BLA नी जबाबदारीने काम करावे – आमदार किशोर आप्पा पाटील

‘मतदार यादी ही राजकीय आयुष्याची शिदोरी’; BLA नी जबाबदारीने काम करावे – आमदार किशोर आप्पा पाटील

April 17, 2026
पुढील चार दिवस उष्णतेची लाट कायम; राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

पुढील चार दिवस उष्णतेची लाट कायम; राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

April 17, 2026
कंत्राटी कामगारांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करा – ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

कंत्राटी कामगारांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करा – ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

April 17, 2026
जळगाव जिल्ह्यात 1,610 रुग्णांना सुमारे 13.33 कोटी रूपयांची वैद्यकीय मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

जळगाव जिल्ह्यात 1,610 रुग्णांना सुमारे 13.33 कोटी रूपयांची वैद्यकीय मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

April 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page