चोपडा, 29 मे : चोपडा तालुक्यातील वडती येथील दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून यामध्ये विशेष म्हणजे विशेष म्हणजे यात दोन विद्यार्थ्यांनी 92 % मिळवत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला.
पूज्य साने गुरुजी माध्यमिक विद्यालयाचा निकाल –
चोपडा तालुक्यातील वडती येथील अमर संस्था संचलित, पूज्य साने गुरुजी माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा विद्यार्थ्यांचा निकाल शंभर टक्के लागला. यात विद्यालयातील 3 विद्यार्थी 90% वर तर 26 विद्यार्थी डिकस्टिंगशनमध्ये आणि 8 विद्यार्थी फर्स्ट क्लासमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. यात खालीलप्रमाणे विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केलेले आहे. विशेष म्हणजे यात दोन विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे.
-
प्रथम – दिपाली लक्ष्मण धनगर – 92 %
-
प्रथम – दुर्गेश कमलेश दिक्षीत – 92 %
-
व्दितीय – वर्षा हिम्मत पाटील – 90 %
-
तृतीय – रोहीणी उदयभान इंगळे – 89.40 %
-
चतुर्थ – तमन्ना सुलतान तडवी – 89 %
-
पाचवा – कोमल सुनील सपकाळे – 88.60
-
पाचवा – मोईन रहिम पिंजारी – 88.60
वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत गुलाबराव पाटील, उपाध्यक्ष मनोज सुरेश चित्रकथी, सेक्रेटरी दिपक भास्कार जोशी तसेच मुख्याध्यापक संजय जोशी तसेच सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
हेही वाचा : गिरणा नदीत पोहायला गेलेल्या मुलाचा मृत्यू, चाळीसगाव तालुक्यातील दुर्दैवी घटना