चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
मुंबई, 17 मे : आपण पंतप्रधान झाल्यानंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी आपण प्रयत्न कराल आणि यासाठी हा प्रश्न मराठी भाषेला तो सन्मान मिळेल, अशी अपेक्षा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून व्यक्त केली. मोदीजी मी आपल्याला धन्यवाद देतो की तुम्ही होतात म्हणून राम मंदिर होऊ शकलं, अन्यथा ते झालंच नसतं., असेही राज ठाकरे म्हणाले. यावेळी राज ठाकरे यांनी पुढच्या पाच वर्षांसाठी नरेंद्र मोदींकडे 3 मागण्या ठेवल्या. राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्याचा प्रचार सुरू आहे. सर्वच पक्षांनी प्रचार करण्यासाठी कंबर कसली आहे. यातच मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
काय म्हणाले राज ठाकरे –
मला असं वाटतं की, गेल्या अनेक अशा योजना मागील 5 वर्षात झाल्या, 90 च्या दशकात एक प्रकरण घडलं ते म्हणजे बाबरी मशिदीचं, मुलायमसिंग यांच्या लोकांनी हजारो लोकं ठार मारली, ते चित्र माझ्या डोळ्यासमोरून गेलं नाही, मनात असं वाटलं की राम मंदिर तयार होणार नाही. पण मोदीजी मी आपल्याला धन्यवाद देतो की तुम्ही होतात म्हणून राम मंदिर होऊ शकलं, अन्यथा ते झालंच नसतं. जेव्हापासून मी पूर्वीचा इतिहास, भारताच्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास, काश्मिरमधील कलम 370 रद्द झालं पाहिजे, ते काम मोदीजींनी करुन दाखवलं. तो भारतातच एक भाग आहे, हे आता सिद्ध झाले.
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर हिंदूस्तानचे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणारे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असा उल्लेख करत त्यांनी भाषणाची सुरुवात केली. या भाषणात ते म्हणाले की, मोदीजींची पहिली 5 वर्ष यावर माझं बोलून झालंय. उरली आता गेली 5 वर्ष, मला असं वाटतं, देवेंद्रजी, मुख्यमंत्री, अजितदादा या सर्वांनी उद्धव ठाकरे यांच्यावर वेळ घालवला. पण जे सत्तेतच येणार नाहीत, त्यावर आपण का वेळ घालवतो, असे राज ठाकरे म्हणाले.
मुस्लिम महिला यांच्यात समाधानाचं वातावरण –
राजीव गांधी पंतप्रधान झाले तेव्हा एक केस झाली होती, तेव्हा सुप्रीम कोर्टाने निकाल शाहबानो नावाच्या महिलेच्या नावाने लावला. यानंतर राजीव गांधींनी लोकसभेमध्ये बहुमताच्या आधारावर तो सुप्रीम कोर्टाचा निकाल तो काढून टाकला. आणि त्या मुस्लिम महिलेला न्याय मिळू शकला नव्हता. पण मोदीजींनी ती एक गोष्ट करुन दाखवली, ट्रिपल तलाक हा कायदा रद्द करुन टाकला आणि हिंदूस्तानाही मुस्लिम महिला यांच्यात समाधानाचं वातावरण झालं. तो विषयत मोदीजींनी बंद करुन टाकला. हे सर्व धाडसी निर्णय मी मानतो.
मराठी भाषेला तो सन्मान मिळेल, ही अपेक्षा! –
मी तुमच्यासमोर फक्त पुढच्या 5 वर्षांसाठी उभा आहे. आमच्या सर्वांच्या अपेक्षा आहेत. मला त्या अपेक्षा बोलून दाखवायच्या आहेत. त्यातील पहिली अपेक्षा, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, हा प्रश्न आपण पंतप्रधान झाल्यानंतर मराठी भाषेला तो सन्मान मिळेल, ही अपेक्षा व्यक्त करतो. दुसरा विषय, देशाच्या अभ्यासक्रमात 125 वर्ष मराठा साम्राज्याचा इतिहास हा शालेय शिक्षणात शिकवला जावा, हा देशात कसा उभा राहिला, हे देशातील पिढ्यांना कळेल. तिसरी गोष्ट, समुद्रामध्ये शिवछत्रपतींचा पुतळा कधी उभा राहील मला माहिती नाही. पण आमच्या शिवछत्रपतींचे गड किल्ल्यांना पूर्वीसारखं ऐतिहासिक वैभव मिळावं म्हणून आंतरराष्ट्रीय समिती तयार करावी. या देशातील पिढ्यांना कळेल की आमचा राजा कोण होता. त्यांनी काय इतिहास गाजवला, हे कळण्यासाठी आपल्याकडून ही गोष्ट होईल, अशी माझी आपल्याकडून अपेक्षा आहे.
संविधानाला कधीही धक्का लागणार नाही –
देशभरात अनेक ठिकाणी तुम्ही उत्तम रस्ते, पुल बनवले. माझी विनंती आहे की मागील 18-19 वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्ग खड्ड्यात आहे, तो लवकरात लवकर व्हावा अशी विनंती. तसेच या संविधानाला कधीही धक्का लागणार नाही, याबाबत तुम्ही विरोधकांना खडसावून सांगावं. या देशात लाखो देशभक्त मुस्लिम मुसलमान आहेत. कोट्यवधी मुसलमानांचा आपल्याला पाठिंबा आहे. पण काही औवैसीसारखे यांच्या मागून फिरणारे जे लोकं आहेत, यांचे जे अड्डे आहेत, त्यांचे अड्डे तपासून घ्या, तिथे माणसं घुसवा, देशाचं सैन्य घुसवा. इतक्याच अपेक्षा मी आपल्यासमोर व्यक्त करतो.
हेही वाचा : “उन्मेश पाटलाच्या डोक्यावर परिणाम झालाय,” एकेरी उल्लेख करत मंत्री गिरीश महाजन यांचा पलटवार