सुनिल माळी, प्रतिनिधी
पारोळा, 27 एप्रिल : भारतीय जनता पक्षाच्या पारोळा तालुकाध्यक्षपदी रविंद्र भोमा पाटील यांची तर पारोळा शहरध्यक्षपदी मुकुंदा भिका चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. भाजप जळगाव लोकसभेचे माजी खासदार ए. टी. पाटील व भाजप नेते मा. नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांचे हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी पारोळा शहराचे माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा व माजी नगरसेविका रेखा चौधरी तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
पारोळा शहराचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार आणि त्यांचे समर्थक अनिल पाटील व मनीष पाटील व अन्य सहकार्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला होता. यामुळे अनिल पाटील व मनीष पाटील यांनी अनुक्रमे तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ही दोन्ही पदे खाली होती.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुका अध्यक्ष व पारोळा शहर अध्यक्षांची नियुक्ती भाजपा प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, रवि अनासपुरे प्रदेश मुख्यालय प्रभारी यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जळकेकर महाराज यांनी केली.
हेही वाचा : सूर्य आग ओकतोय, जळगावचे तापमान महाराष्ट्रात सर्वात जास्त, पुढचे तीन दिवस आणखी महत्त्वाचे..