जळगाव, 2 जुलै : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. राज्यातील काही जिल्ह्यात काल जोरदार पाऊस झाला तर काही ठिकाणी संततधार पाऊस सुरू असल्याचे चित्र आहे. दरम्यान, काही ठिकाणी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने पुढील पाच दिवस राज्यातील काही भागात जोरदार तर अनेक भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
राज्यात जोरदार पावसाची शक्यता –
महाराष्ट्रात सध्या पावसासाठी पुन्हा एकदा पोषक वातावरण तयार झाले आहे. या पार्श्वभूमीवर पुढील दोन ते तीन दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. यामध्ये ऑगस्टपर्यंत राज्यात भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाची अंदाज व्यक्त करण्यात आलाय. यामध्ये महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यात अतिजोरदार तर 16 जिल्ह्यात जोरदार तर 6 जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, यामध्ये खान्देशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीनही जिल्ह्यांचा जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.
सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट –
सातारा जिल्ह्याला अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. कोकण, पुणे तसेच नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मुंबई, ठाणे सिंधुदुर्ग, यवतमाळ, नागपूर, वर्धा आणि भंडारा या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, पुणे, कोल्हापूर आणि सांगलीत गेल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.
जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज –
जळगाव जिल्ह्यात आतपर्यंत समाधानकारक पाऊस झाल्याने शेतीतील पिके सध्यातरी चांगल्या अवस्थेत आहेत. जळगाव जिल्ह्यातील विविध भागात काल पावसाने जोरदार हजेरी लावली. दरम्यान, जिल्ह्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हेही वाचा : ‘संघावर बोलण्याची राऊतांची पात्रता आहे का?’, मंत्री गिरीश महाजन कडाडले, नेमकं काय म्हणाले?