मुंबई : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या निर्णय घेण्यात आले. या निर्णयांमध्ये पाचोरा तालुक्यातील संदर्भातील एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये जळगांव जिल्ह्यातील मौजे पाचोरा येथील भुखंडावरील क्रींडागणाचे आरक्षण वगळून, त्याचा रहिवास क्षेत्रात समावेश करण्यास मान्यता देण्यात आली.
यासोबतच आजच्या मंत्रिमंडळाच्या या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग, परिवहन, आरोग्य, नगरविकास आदी विभागांनी अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाचोरा तालुक्यातील निर्णय नेमका काय?
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा नगरपरिषदेच्या विकास योजनेतील मौजे पाचोरा येथील सर्व्हे क्र. 44/1 मधील आरक्षण क्रमांक 49 – ‘क्रीडांगण’ हे आरक्षण वगळून त्याऐवजी त्या जागेचा वापर रहिवासी विभागासाठी करण्याचा प्रस्ताव आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.
हा प्रस्ताव पाचोरा नगरपरिषदेकडून 5 एप्रिल 2021 रोजी शासनाकडे सादर करण्यात आला होता. आरक्षण काढून टाकण्यात येत असलेल्या क्षेत्राचा विचार करता, या प्रभागात खेळाच्या मैदानासाठी आवश्यक असलेल्या जागेपेक्षा सध्या उपलब्ध आरक्षण क्षेत्र पुरेसे असल्याचा अहवाल नगररचना विभागाने दिला. त्याशिवाय लगतच्या प्रभाग 1 मध्येसुद्धा 13 हेक्टरहून अधिक क्षेत्र खेळाच्या गरजांसाठी आरक्षित असल्याने विभागाच्या या फेरबदलाच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.