देशातली 3 ग्रामपंचायतींना कार्बन न्युट्रल विशेष पंचायत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्यातील बेला ग्रामपंचायतीला कार्बन न्युट्रल विशेष पंचायत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते बेला ग्रामपंचायतीच्या सरपंच शारदा गायधने यांनी हा पुरस्कार स्विकारला. कार्बन न्यूट्रल श्रेणीत या ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक मिळवला, या निमित्ताने ‘सुवर्ण खान्देश लाईव्ह’च्या टीमने या गावाच्या सरपंच शारदा गायधने यांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी आपल्या गावाला राष्ट्रीय पातळीवर कसं पोहोचवलं, हा प्रवास उलगडला. तसेच त्यांचा सरपंच पदाचा कार्यकाळ आणि ग्रामविकासाची संकल्पनाही मांडली. पाहा, ही विशेष मुलाखत.