मुंबई, 2 जुलै : राज्यात राजकारणात आज मोठा भूकंप घडला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मोठे भाष्य केले. आगामी निवडणुका या राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह म्हणूनच लढवणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
पत्रकार परिषदेत अजित पवार काय म्हणाले?
राष्ट्रवादी पक्षात तरुणांना संधी देण्याची गरज आहे. नवीन कार्यकर्ते पुढे आणले पाहिजे, तसा प्रयत्न आमचा राहणार आहे. आधी अडीच वर्ष सत्तेत काम करत असताना कोरोना काळात विकासाचं काम केले. मी कामाशी मतलब ठेवतो. तसेच राज्याला केंद्रातून निधी कसा मिळेल, राज्यातील प्रत्येक घटकाला मदत मिळावी, असा निर्णय आम्ही घेतला. पक्षातील सहकारी नेते आणि कार्यकर्त्यांना हा निर्णय मान्य असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा – BIG News : अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील, उपमुख्यमंत्री पदाची घेतली शपथ
तसेच ते पुढे म्हणाले की, आम्ही पुढे राष्ट्रवादी पक्ष म्हणूनच कुठलीही निवडणूक असेल, नगर पालिका, महापालिका असेल, त्या निवडणुका या राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह म्हणूनच निवडणूक लढवणार आहोत. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीने एकत्र काम केलं. राज्याच्या विकाससाठी मागसवर्गीय, गरिब आणि शेतकऱ्यांना मदत देण्यासासाठी आम्ही काम करणार आहोत. आम्हाला जी खाती दिली जाणार, ती कामं आम्ही करणार आणि पक्षालाही मजबूत करणार आहोत, असे ते म्हणाले.