• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

‘लोकांना शक्य तितक्या सेवा घरबसल्या कशा मिळतील, यावर भर द्यावा’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

सरकारच्या आगामी काळातील वाटचालीची दिशा केली स्पष्ट

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 10, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
Chief Minister Devendra Fadnavis speaking at a special review meeting of senior officers held in the Committee Hall at Vidhan Bhavan

विधानभवन येथील समिती सभागृहात आयोजित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विशेष आढावा बैठकीत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

मुंबई : महाराष्ट्र हे असिमित ताकदीचे राज्य आहे. आता आपण क्रमांक एक वर आहोत, म्हणून थांबू नका, असा मंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या सचिवस्तरीय अधिकाऱ्यांना दिला. जुनी पुण्याई असली तरी नवी पुण्याई पुन्हा मिळवली पाहिजे, असे सांगतानाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी पायाभूत सुविधांप्रमाणेच राज्य सरकारच्या फ्लॅगशीप योजनांसाठीही स्वतंत्र वॉररूम सुरू करण्याचे निर्देश यावेळी दिले.

विधानभवन येथील समिती सभागृहात काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव आदी वरीष्ठ अधिकाऱ्यांची विशेष आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सरकारच्या आगामी काळातील वाटचालीची दिशा केली स्पष्ट केली.

पारदर्शकता, गतिशीलता आणि प्रामाणिकता यावर अधिक भर द्या, असे नमूद करून, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारच्या सहकार्याचा राज्याच्या प्रगतीसाठी पुरेपूर वापर करून घेतला पाहिजे. यासाठी अधिक समन्वय, पाठपुराव्याची व्यवस्था निर्माण करा. याकरिता नवी दिल्ली येथे महाराष्ट्र सदनाच्या माध्यमातून व्यवस्था उभी करा. एक वॉररूम पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी आहेच. ही वॉररूम आणखी कार्यक्षम करा. कोणते प्रकल्प त्यात असले पाहिजे, याची मुख्य सचिवांनी नव्याने रचना करावी. या धर्तीवर राज्यातील केंद्र आणि राज्य सरकारच्या फ्लॅगशिप योजनांसाठी पण दुसरी वॉररूम आता असेल. त्यातून सर्वसामान्य लोकांपर्यत लाभ गतीने पोहोचले पाहिजे. यासाठी प्रयत्न करता येतील. यात जनता दरबार, लोकशाही दिन कार्यक्रम वेगाने हाती घ्या. हे कार्यक्रम सुरू झालेच पाहिजे, ते तळागाळात नेले पाहिजेत.

आपले सरकार पोर्टल पुन्हा नव्याने पूर्ण क्षमतेने चालविण्यात यावे. जिल्ह्यांच्या पालक सचिवांनी आपआपल्या जिल्ह्यांचे तातडीने दौरे सुरु करावेत. पालक सचिवांनी आपल्या अनुभवाचा फायदा त्या-त्या जिल्ह्यांना करून देण्यावर भर द्यावा. वेगवेगळ्या विभागाचे पोर्टल अपडेट करा. ते अधिक प्रभावी करा. त्यातून लोकांना शक्य तितक्या सेवा घरबसल्या कशा मिळतील, यावर भर दिला पाहिजे. अर्थातच यात उत्कृष्ट काम करणाऱ्या विभागांना मंत्रिमंडळ बैठकीत सन्मानित करण्यात येईल, असेही मुख्यंत्र्यांनी सांगितले.

राज्य शासनाची सर्व संकेतस्थळ हे आरटीआय फ्रेंडली करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. ते म्हणाले की, ‘इज ऑफ लिव्हिंग’वर सर्वाधिक भर द्या. राज्यभरातून नागरिक सर्वाधिक कोणत्या कारणासाठी आपल्याकडे येतात आणि त्यांना त्या सेवा घरबसल्या कशा मिळतील, यावर भर देण्यासाठीचे नियोजन केले जावे. यासाठी सहा-सहा महिन्याचे दोन टप्पे करून उद्दिष्ट गाठता येईल. यासाठी निवृत्त अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा घेता येईल, त्यासाठी त्यांची एक समिती गठित करून अभ्यास अहवाल तयार करण्यात यावा.

कर्मचाऱ्यांच्या तक्रारींकडे प्राधान्याने लक्ष देण्यात यावे. त्यांचा थेट सचिवांशी संवाद व्हावा आणि त्यातून त्यांच्या समस्यांचे निराकरण व्हावे, यावर भर देण्यात यावा. नवीन नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे आवश्यक आहे. त्यानंतरच त्यांना त्यांच्या सेवेशी संबंधित जिल्ह्यात पदस्थापना दिल्या जाव्यात. जेणेकरून त्यांना काम करणे सोपे होईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

नागरिकांना सुविधा देण्यासाठी तसेच, प्रशासकीय कामांसाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याची सूचना देऊन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी त्यासाठी प्रत्येक विभागाने शंभर दिवसांचा कार्यक्रम तयार करून तो सादर करावा, असे निर्देशही दिले.

Video : “….तेव्हा नो बॅलेट, ओन्ली बुलेट”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अधिवशेनात जोरदार फटाकेबाजी

बातमी शेअर करा !
Share
Tags: devendra fadnavisdevendra fadnavis marathi newsgovernment of maharashtramaharashtra governentmaharashtra newsmahayuti governmentmahayuti sarkarvidhanbhavan

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 860 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात; खासदार-आमदार, अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 860 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात; खासदार-आमदार, अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

June 16, 2025
Video : पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल, पाहा व्हिडिओ

Video : पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल, पाहा व्हिडिओ

June 16, 2025
Video | ‘….त्यामुळे हा पूल कोसळला!’ घटनास्थळाच्या पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Video | ‘….त्यामुळे हा पूल कोसळला!’ घटनास्थळाच्या पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

June 16, 2025
इंद्रायणी पुल दुर्घटना; चार जणांचा मृत्यू, 51 जणांना वाचविण्यात यश, नेमकं काय घडलं?

इंद्रायणी पुल दुर्घटना; चार जणांचा मृत्यू, 51 जणांना वाचविण्यात यश, नेमकं काय घडलं?

June 16, 2025
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात; सात जणांचा दुर्दैवी मृत्यू, महाराष्ट्रातील तिघांचा समावेश | नेमकं काय घडलं?

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात; सात जणांचा दुर्दैवी मृत्यू, महाराष्ट्रातील तिघांचा समावेश | नेमकं काय घडलं?

June 15, 2025
“…..यामुळे आमच्या पक्षात येणाचा ओढा वाढतोय”, वाढत्या भाजप प्रवेशावर मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य

“…..यामुळे आमच्या पक्षात येणाचा ओढा वाढतोय”, वाढत्या भाजप प्रवेशावर मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य

June 15, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page