जालना, 26 जून : राज्यात दिवसेंदिवस अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असताना जालना जिल्ह्यातून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे, समृद्धी महामार्गावर दोन कारचा भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावरील जालना जिल्ह्यातील कडवंजवळ काल रात्री 11 वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. नागपूरकडून मुबंईकडे जाणाऱ्या ईरटीगा कारला (कार क्रं. MH.47.BP. 5478) डिझेल भरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने (कार क्रं. MH.12.MF.1856) जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, स्विफ्ट कारने धडक दिल्यानंतर ईरटीका कार आणि स्विफ्ट कार समृद्धी महामार्गाचे बॅरिकेट्स तोडून खाली गेल्याची माहिती समोर येत आहे.
सात जणांचा जागीच मृत्यू –
जालना जिल्ह्यातील कडवंजवळ झालेल्या या भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना स्थानिकांच्या मदतीनं उपचारसाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आलं आहे.
हेही वाचा : “त्यांनी तर अडीच वर्ष लाडका बेटा योजना राबविली,” मुख्यमंत्री शिंदेंचे ठाकरेंना प्रत्युत्तर






