नंदुरबार, 26 फेब्रवारी : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा महाबीजद्वारे सुधारित रब्बी ज्वारी फुले सुचित्रा या वाणाचे पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता. सारंगखेडा येथील मुरलीधर पाटील यांच्या शेतावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात पीक पाहणीसाठी महाबीजचे भागधारक आणि नगराध्यक्ष मोतीलाल तात्या उपस्थित होते. दाणे टपोरे व सफेद आहेत. त्यामुळे चांगला बाजार भाव या वाणास मिळेल. म्हणून सदर वाणाची लागवड करावी, असे आवाहन यावेळी शेतकऱ्यांना करण्यात आले.
वडाच्या झाडाखाली शेत महाबीजचे बिजोत्पादनाचे कार्यक्रम, बियाणे खरेदी धोरण, बिजोत्पादन कार्यक्रम कसा फायदेशीर ठरेल तसेच जागतिक तृणधान्य वर्ष 2023 च्या निमित्ताने तृणधान्याचे आहाराती महत्त्व याबाबत शहाद्याच्या कृषी अधिकारी अनिता ठाकरे यांनी सविस्तर माहिती सांगितली. तर मुरलीधर पाटील यांनी महाबीज बियाणे लागवड, दर्जा आणि कसे फायदेशीर आहे, त्याबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली.
SPECIAL STORY : शेतकऱ्याच्या पोरीनं नाव कमावलं! नंदुरबारच्या मेघानं मिळवलं विद्यापीठात Gold Medal
यावेळी जगनभाई, मधुभाई, योगेशभाई, वसंतभाई, रविभाई, जुनेद पिंजारी, गोट्या भिल, भुरा कोळी, किसन कोळी, रवींद्र कुवर, तुळशीराम कोळी, भोला भोई आणि पिटर गिरासे आदी नागरिकांसह महिला वर्गही यावेळी उपस्थित होता.