रायगड, 24 फेब्रुवारी : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाला निवडणूक चिन्ह दिल्यानंतर आज रायगड किल्ल्यावर तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाचे अनावरण करण्यात आले. शरद पवार यांनी रायगडावर शरद पवार स्वतः उपस्थित होते.
काय आहे संपूर्ण बातमी? –
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाचे अनावरण करण्यात आले आहे. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह तळागाळात पोहोचवण्यासाठी रायगड किल्ल्यावर आज भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शरद पवार यांच्या उपस्थितीत जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी तुतारी वाजवून आगामी निवडणुकींचे रणशिंग फुंकले.
शरद पवार 40 वर्षानंतर रायगडवार –
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाचे अनावरण कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार तब्बल 40 वर्षानंतर रायगडावर गेले. दरम्यान, या पक्षचिन्हाचा जास्तीत जास्त प्रचार, प्रसार व्हावा यासाठी शरद पवार गटाकडून प्रयत्न केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज सकाळी या चिन्हाचे अनावरण रायगड किल्ल्यावर करण्यात आले. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार असे नाव दिले होते. त्यानंतर आता नवीन चिन्ह दिले आहे.
हेही वाचा : कामागारांच्या पीएफचे पैसे वळविले गर्लफ्रेंडच्या खात्यावर, कंपनीच्या सुपरवायझरचं धक्कादायक कृत्य