पाचोरा, 13 जानेवारी : पाचोरा तालुका आणि भडगाव तालुक्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरुन पाचोरा आणि भडगाव तालुका तसेच शहरासाठी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम नुकताच पाचोरा येथील शिवसेना कार्यालयात पार पडला.
पाचोरा तालुका आणि पाचोरा शहर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे –
उपजिल्हाप्रमुख – उद्धव मराठे
तालुकाप्रमुख – शरद पाटील
उपजिल्हासंघटक – विनोद बाविस्कर
उपजिल्हा समन्वयक – धर्मराज पाटील
तालुका संघटक – देविदास पाटील
तालुका समन्वयक – ज्ञानेश्वर पाटील
पाचोरा शहरप्रमख – अॅड. दीपक पाटील आणि अिल सावंत
पाचोरा शहरसंघटक – दत्ताभाऊ जडे आणि राजेंद्र राणा
पाचोरा शहर समन्वयक – दादाभाऊ चौधरी आणि बंडूभाऊ मोरे
भडगाव तालुका आणि भडगाव शहर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे –
उपजिल्हाप्रमुख – दीपक पाटील
तालुकाप्रमुख – अनिल पाटील
विधानसभा क्षेत्रप्रमुख – जे. के. पाटील
उपजिल्हा संघटक – शाम पाटील सर आणि रतन परदेशी
उपजिल्हा समन्वयक – गोरख पाटील
तालुका संघटक – राजेंद्र पाटील
भडगाव शहरप्रमुख – शंकर मारवाडी
भडगाव शहरसंघटक – अनिल महाजन आणि निलेश पवार
कार्यक्रमाला हे मान्यवर उपस्थित –
दरम्यान, भडगाव आणि पाचोरा तालुक्यातील या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीनंतर त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी, तालुका संपर्कप्रमुख सुनीलभाऊ पाटील, नरेंद्रसिंग पाटील, रमेशशेठ बाफना, डॉ. योगेंद्रसिंग मौर्य, तिलोत्तमाताई मौर्य, अरुणभाऊ पाटील, राजूभाऊ साळुंखे, युवासेना उपजिल्हाप्रमुख संदीप जैन, माजी नगराध्यक्ष प्रशांत पवार, माजी नगरसेवक दादाभाऊ चौधरी, पप्पू राजपूत, जितेंद्र जैन, अजय पाटील, युवासेना तालुकाप्रमुख भूपेश सोमवंशी, गौरव पाटील, जगदीश पाटील, संतोष पाटील, नंदू पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, या कार्यक्रमाचे संचालन नाना वाघ यांनी केले.