चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 22 मे : दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ असताना जळगावातून मोठी बातमी समोर आली आहे. ईडीच्या कार्यालयातून बोलत असल्याची सांगत डॉक्टराची 19 लाख रूपयांत फसवणूक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एका डॉक्टरला 1 मे रोजी सुनीलकुमार नामक आणि अंकुश वर्मा व्यक्तींचे फोन आले. त्यांनी आम्ही ईडीच्या ऑफिसमधून बोलतोय असे डॉक्टरांना सांगितले. मनी लॉड्रींगमध्ये तुमचे बँक खाते आले असून त्यात तुमचा सहभाग आहे, असे दिसते असल्याचेही त्यांनी सांगितले. यावरून त्यांनी डॉक्टरांच्या मनात भीती निर्माण केली. दरम्यान, संशयितांनी त्यांचे बँक खात्याचा क्रमांक पाठवून त्यात पैसे टाकण्यास डॉक्टरला सांगितले.
संबंधित प्रकरणात डॉक्टरने समोरच्याने सांगितल्याप्रमाणे 1 ते 18 मेपर्यंत या कालावधीत 19 लाख 20 हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. कालांतराने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी ऑनलाईन तक्रार नोंदविली. त्यानंतर 21 मे रोजी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय निकम तपास करीत आहेत.
हेही वाचा : सामनेरच्या तरुणाची गरुडझेप! UPSC परीक्षेत मिळवलं मोठं यश; वाचा, कुणालची प्रेरणादायी कहाणी