पाचोरा, 7 जानेवारी : पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पाचोरा जि. जळगाव यांच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबिर नुकतेच संपन्न झाले. पाचोरा तालुक्यातील ओझर येथे दि. 24 डिसेंबर 2022 ते दि. 30 डिसेंबर 2022 च्या दरम्यान हे येथे आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन कनिष्ठ महाविद्यालयीन व्यवस्थापन समितीचे प्रमुख सुरेश देवरे यांच्या हस्ते झाले. तर प्रमुख पाहुणे म्हणून पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या दक्षता समितीचे प्रमुख सुभाषजी तोतला उपस्थित होते. या उद्घाटनाच्या कार्यक्रमप्रसंगी धरणगाव महाविद्यालयात कार्यरत माननीय प्रा. राखी पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.
या विशेष दिवाळी शिबिरात सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. अतुल सूर्यवंशी यांनी सर्व स्वयंसेवकांना योगाची माहिती सांगून योगाची प्रात्यक्षिके करून घेतली. या शिबिरात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांसाठी आयोजित बौद्धिक सत्रात 25 डिसेंबर रोजी चला समृद्ध जीवन जगूया या विषयावर डॉ. संजय माळी यांनी मार्गदर्शन केले. 26 डिसेंबर रोजी पाचोऱ्याचे तहसीलदार कैलास चावडे यांनी नागरिक व प्रशासन या विषयावर स्वयंसेवकांची चर्चा केली.
27 डिसेंबर रोजी रविंद्र पाटील यांनी राजा माझा सांगून गेला या विषयावर मार्गदर्शन करीत असताना हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. तर 28 डिसेंबरला प्रा. डॉ. अतुल सूर्यवंशी यांनी भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचा इतिहास या विषयावर इतिहासाचे वेगवेगळे समर्पक दाखले देत जिवंत इतिहास विद्यार्थ्यांसमोर सादर केला.
हेही वाचा – मराठी पत्रकार दिन : पाचोऱ्यातील वडगाव कडे येथे पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन
यानंतर 29 डिसेंबर रोजी अॅडव्होकेट भाग्यश्री महाजन यांनी उपस्थित स्वयंसेवकांना महिला सबलीकरण व कायदा या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तर कनिष्ठ महाविद्यालयाच्या या विशेष हिवाळी शिबिराचा समारोप पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्या उपस्थितीत पार पडला.