मुंबई, 2 फेब्रुवारी : अंतरवाली सराटी ते मुंबईतील पायी मोर्चापर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संघर्ष नेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनोज जरांगेबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारचा मोठा निर्णय –
मनोज जरांगे यांच्याबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून मनोज जरांगे यांच्या सुरक्षेसाठी आता पोलीस तैनात असणार आहे. मनोज जरांगे पाटील यांना आता सरकारी सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आजपासून मनोज जरांगे यांच्या सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
मनोज जरांगे यांना सरकारी सुरक्षा –
राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आदेशानुसार मनोज जरांगे यांना पोलीस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनोज जरांगेंच्या सुरक्षेसाठी 24 तास दोन सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. दरम्यान, त्याआधी सकल मराठा समाजाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मनोज जरांगे यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आजपासून दोन सशस्त्र पोलिस कॉन्स्टेबल सुरक्षेसाठी नेमण्यात आले आहेत.
हेही वाचा : Video : केळी उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर शिंगाडा मोर्चा, पाहा व्हिडिओ