• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home चाळीसगाव

गिरणा नदीतील वाळू लिलावास चार ग्रामपंचायतींचा तीव्र विरोध, चाळीसगाव तालुक्यात नेमकं काय घडलं?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 26, 2023
in चाळीसगाव, जळगाव जिल्हा
गिरणा नदीतील वाळू लिलावास चार ग्रामपंचायतींचा तीव्र विरोध, चाळीसगाव तालुक्यात नेमकं काय घडलं?

चाळीसगाव, 26 सप्टेंबर : चाळीसगाव तालुक्यातील बहाळसह भऊर, वरखेडे बुद्रुक, खुर्द व मेहुणबारे या चार ग्रामपंचायतींनी ग्रामसभा आयोजित केली होती. या ग्रामसभेत गिरणा नदीमधील वाळू लिलाव करण्याच्या ठरावाला विरोध दर्शवला आहे. या परिसरात मुबलक वाळू साठा आहे. त्यामुळे या ठरावाकडे लक्ष होते. मात्र, या वाळू लिलावास चार ग्रामपंचायतीचा तीव्र विरोध केला आहे.

कुठे करण्यात आलं ग्रामसभेचं आयोजन –
वाळू लिलावासंदर्भात प्रांतधिकारी प्रमोद हिले यांच्या अध्यक्षतेखाली बहाळ येथे या ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेला ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यावेळी ग्रामस्थांनी वाळू लिलावास तीव्र विरोध केला. यासोबतच वाळू लिलावासंदर्भात चाळीसगाव तालुक्यात आज भऊर भाग 1.2,3, तामसवाडी, वरखेडे बुद्रुक, बरखेडे खुर्द, मेहुणबारे या सर्व गावातही विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी सुद्धा ग्रामस्थांनी या ठरावला तीव्र विरोध केला.

ग्रामस्थांचा तीव्र विरोध –
वाळू उत्खनानामुळे गावातील जलस्रोतावर विपरीत परिणाम होतो. सोबतच गावात वाळूच्या उपशावरून भांडणे होतात. तसेच गिरणा नदीवर अनेक गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. मात्र, वाळू उपसा जर झाला तर पिण्यास पाणी मिळणार नाही. या कारणांमुळे गावकऱ्यांनी वाळू गटाचा लिलाव करण्यास विरोध केला.

जळगाव जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाकडून नव्याने वाळू गटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, बहाळ ग्रामपंचायत हद्दीतील गट नं. 846 व 826च्या काही भागातील नदीपात्रातील वाळू गटांच्या लिलावासाठी ग्रामसभेचा ठराव आवश्यक असतो. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने हे ठराव मागवलेले आहेत. मात्र, गिरणा नदी पात्रातील गटांमधून वाळूचे उत्खनन होणार नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतींची राहणार आहे. त्या गटातून वाळू उत्खनन होत असल्याचे दिसल्यास त्याला ग्रामपंचायतींनी प्रतिबंध करावा. तर सन 2023/24 साठी यापूर्वी 6 रोजी तामसवाडी ग्रामपंचायतीचा वाळू लिलावाला विरोधाचा ठराव देण्यात आला होता.

दरम्यान, नदी पात्रातील वाळू घाट निश्चित केले आहेत. यात 32 हजार 500 चौरस मीटर याच भागातील 34 हजार ब्रास वाळू उपसा केला जाईल, असे अप्पर तहसीलदार जगदीश भरकर यांनी सांगितले. तर, तहसीलदार प्रशांत पाटील यांनी वाळू ठरावाला विरोध करण्यासाठी जसे आला आहात, तसाच विरोध गावातील दारूबंदी विरोधात करून ठराव करावा, असे सांगून ग्रामस्थांचे त्यांनी आभार मानले.

यांची होती उपस्थिती –
यावेळी प्रांतधिकारी प्रमोद हिले, तहसीलदार प्रशांत पाटील, बहाळचे मंडळ अधिकारी विष्णुकुमार राठोड, मेहुणबारे येथील मंडळधिकरी सुनील पवार, शिरसगावचे मंडळाधिकारी उल्हास देशपांडे, तलाठी सचिन हातोडे, तलाठी प्रशांत कणकुरे, पोलीस पाटील हरिश्चंद्र पाटील, ग्रामसेवक पंकज चव्हाण, सरपंच राजेंद्र मोरे, उपसरपंच किरण पाटील, ग्राम पंचायत सदस्य नाना भोई, प्रकाश ठाकूर, राकेश शिरुडे, माजी सभापतील आर. एल. पाटील, दशरथ मोरे, गुलाब पाटील, सोसायटीचे संचालक कैलास शिंपी, संदीप पाटील, नेताजी पाटील, विक्रम महाजन, सुभाष कोळी, राहुल परदेशी, वाल्मीक पाटील, ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांची उपस्थिती होती.

बातमी शेअर करा !
Share
Tags: chalisgaon newsgirna rivergram panchayatssand auction

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भारत-फ्रान्स संबंधांना ‘स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा दर्जा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घोषणा

भारत-फ्रान्स संबंधांना ‘स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा दर्जा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घोषणा

February 18, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची घेतली भेट! अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशीची मागणी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची घेतली भेट! अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशीची मागणी

February 18, 2026
जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे शिवजयंती उत्सवाचे भव्य आयोजन; आजपासून 20 फेब्रुवारीदरम्यान विविध कार्यक्रमांची रेलचेल

जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे शिवजयंती उत्सवाचे भव्य आयोजन; आजपासून 20 फेब्रुवारीदरम्यान विविध कार्यक्रमांची रेलचेल

February 18, 2026
आरडी फाउंडेशन आणि शकुंतलाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर

आरडी फाउंडेशन आणि शकुंतलाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर

February 17, 2026
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला ‘एआय’ची जोड मिळाल्यास त्यांचा शाश्वत विकास शक्य – विजया रहाटकर

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला ‘एआय’ची जोड मिळाल्यास त्यांचा शाश्वत विकास शक्य – विजया रहाटकर

February 17, 2026
आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

February 17, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page