ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 26 जून : पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातर्फे एमबीबीएस आणि आयआयटीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. संस्थेचे चेअरमन आणि पाचोरा भडगाव राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना सन्मानित करण्यात आले.
आयआयटीसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये तन्मय शरद माथूरवैश्य, कृष्णा ईश्वर देशमुख, किरण संजीव पाटील, यश शशिकांत येवले, अथर्व प्रशांत पाटील यांचा समावेश आहे. तर त्यासोबतच नीट या वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेत घवघवीत यश मिळवून एमबीबीएससाठी पात्र ठरलेले विद्यार्थ्यांमध्ये दिपाली सोनवणे, अर्णव नितीन पाटील, सानिका पाटील, आकांक्षा नरेश गवांदे, अनुजा गोपाल चौधरी, आरोही चारुदत्त खानोरे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांच्या वतीने अर्णव पाटील, अनुजा चौधरी, किरण पाटील या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. तर पालकांच्या वतीने डॉ. गोपाल चौधरी, डॉ. नरेश गवांदे यांनीही आपली मनोगत व्यक्त केले. संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांनी गुणवत्ता प्राप्त सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना सन्मानित केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. अतुल सूर्यवंशी यांनी केले. यानंतर प्रा. डॉ. सुनिता गुंजाळ यांनी उपस्थित मान्यवरांच्या प्रती आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे व्हाईस चेअरमन व्ही टी जोशी, कनिष्ठ महाविद्यालयीन व्यवस्थापन समितीचे प्रमुख नानासाहेब सुरेश देवरे, ज्येष्ठ संचालक आप्पासाहेब सतीश चौधरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ. वासुदेव वले, उपप्राचार्य प्रा. डॉ. जे. व्ही. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. जी. बी. पाटील, डॉ. गोपाळ चौधरी, डॉ. नरेश गवांदे, विश्वासराव साळुंखे, शरद माथूरवैश्य, भडगाव पंचायत समितीला कृषी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले ईश्वर देशमुख, कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू भगिनी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.