मिलिंद वाणी, प्रतिनिधी
चोपडा, 2 एप्रिल : केंद्र शासनाची राष्ट्रीय साधन-सह-गुणवत्ता शिष्यवृत्ती”(NMMS) परीक्षेत पूज्य साने गुरुजी माध्यमिक विद्यालय वडती येथील तीन विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली. सदर परीक्षेत आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेले गुणवंत विद्यार्थी ही परीक्षा देत असतात.
या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता नववी पासून तर बारावी पर्यंत दरवर्षी 12000 असे एकूण 48000 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळत असते.
दरम्यान, साने गुरुजी विद्यालयातील 03 विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत निवड झाल्याने ते शिष्यवृत्ती साठी पात्र ठरले आहेत.
गुणवत्ता यादीत निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये अश्विनी कैलास वाघ, अथांग रविंद्र संदानशिव आणि रुद्र संतोष खैरनार यांचा समावेश आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थी यांचे संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष मनोज चित्रकथी, सचिव दीपक जोशी शाळेचे मुख्याध्यापक संजय जोशी, वर्ग शिक्षक राजेश चौधरी तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यानी सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.