धुळे, 8 मार्च : धुळे जिल्ह्यातील सांगवी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना अलंकार चित्र मंदिराचे मालक राजेंद्र अग्रवाल यांच्या सेवावृत्तीने छावा चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध करण्यात आली.
शालेय विद्यार्थ्यांना देखील आपल्या पूर्वजांचा गौरवशाली इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून माहिती व्हावा म्हणून सांगवी केंद्राचे केंद्रप्रमुख रुपेश जैन यांनी राजेंद्र अग्रवाल यांच्याकडे विनंती केली असता त्यांनी तात्काळ होकार देऊन शालेय विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या दरात छावा चित्रपट पाहण्याची सोय करून दिली.
आपल्या पूर्वजांचे बलिदान व गौरवशाली इतिहास आपण विसरत असून अनेक जण चुकीच्या मार्गाला जात आहेत.आम्हाला इतिहासाचा महत्त्वाचा अध्याय समजण्यास मदत झाली असून छावा चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध झाल्यामुळे आमच्या मध्ये देखील क्षात्रतेजाचे स्फुरण संचारले आहे.
– कु. लावण्या रविंद्र शिंपी (इ. 9 वी)
सर्व विद्यार्थ्यांनी राजेंद्र अग्रवाल, केंद्रप्रमुख रुपेश जैन तसेच या कामी सांगवी माध्यमिक विद्यालयाचे प्राध्यापक ज्ञानेश्वर भोई. सर्जेराव शिंदे, व्ही. आर. बडगुजर, एस. ए. माळी यांनी मेहनत घेतली म्हणून आभार व्यक्त केले.