वाशिंग्टन (अमेरिका), 19 जानेवारी : गेल्या 9 महिन्यांपासून अधिक काळ संशोधनासाठी अंतराळात घालवून भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर अखेर 9 महिन्यांनी पृथ्वीवर परतले आहेत. भारतीय प्रमाण वेळेनुसार आज पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास अमेरिकेतील फ्लोरिडाच्या किनारी त्यांचे सुखरूप आगमन झाले. दरम्यान, या दोघांचे यशस्वीरित्या पृथ्वीवर आगमन झाल्याने त्यांच्या अफाट धैर्याला भारतासह संपुर्ण जगाकडून सलाम केला जातोय.
मागील वर्षी जूनमध्ये अंतराळात –
सुनिता विल्यम्स ह्या मूळ भारतीय वंशाच्या आहेत. त्या सध्या नासात संशोधक म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान, मागील वर्षी 5 जून 2024 रोजी सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर या दोघांनीही गेल्या वर्षी 5 जून रोजी केप कॅनवेरल येथून बोईंगच्या नवीन स्टारलाइनर कॅप्सूलमधून उड्डाण केले. नासाच्यावतीने ते फक्त आठ दिवसांच्या मिशनसाठी गेले होते. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे ते होऊ शकले नाही. यानंतर अंतराळ स्थानकावरून हे यान क्रूशिवाय सोडण्यात आलं होतं.
सुनीता आणि विल्मोर यांना स्पेस स्टेशनवर का पाठवण्यात आलं? –
सुनीता आणि बुच विल्मोर बोइंग आणि नासाच्या संयुक्त ‘क्रू फ्लाइट टेस्ट मिशन’ यासाठी गेले होते. यामध्ये सुनिता या यानाच्या पायलट होत्या तर त्यांच्यासोबत गेलेले बुच विल्मोर हा या मोहिमेचा कमांडर होते. असे असताना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) 8 दिवसांच्या वास्तव्यानंतर ते दोघेही पृथ्वीवर परतणार होते. दरम्यान, अंतराळवीरांना अंतराळ स्थानकावर घेऊन जाण्याची आणि त्यांना परत आणण्याची अंतराळयानाची क्षमता सिद्ध करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता.
फक्त 8 दिवसांचा प्रवास अन् पोहोचला 9 महिन्यांवर –
सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोघंही अंतराळवीर फक्त आठ दिवसांच्या मिशनसाठी गेले होते. मात्र, अंतराळ यानामधून हीलियमची गळती आणि वेग कमी झाल्यामुळे ते जवळपास नऊ महिन्यांहून अधिक काळ अंतराळ स्थानकात अडकले होते. यानंतर त्यांना पृथ्वीवर आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात होते. एवढ्या अथक प्रयत्नांनंतरही त्यांचे पृथ्वीवर पुनरागमन वारंवार लांबत होते.
एलन मस्क यांच्या SpaceX कंपनीवर परत आणण्याची जबाबदारी –
स्पेसएक्सचे सीईओ तथा जगातील श्रीमंत उद्योपती एलोन मस्क यांना अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांना परत आणण्याची जबाबदारी स्विकारली होती. यासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जानेवारीमध्ये सोशल मीडियावर लिहिले होते की, मी एलन मस्क यांना त्या दोन ‘शूर अंतराळवीरांना’ परत आणण्यास सांगितले आहे. दरम्यान, अंतराळवीरांना पत आणण्याची जबाबदारी स्विकारली होती. त्यानुसार त्यांनी काम करायला सुरूवात केली होती. यानंतर सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर यांना परत आणण्यासाठी स्पेसएक्स या कंपनीने 15 मार्च रोजी त्यांचे स्पेस क्राफ्ट क्रू-10 पाठवले.
सुनिता विल्यम्स यांच्या परतीचा ‘असा’ राहिला प्रवास –
सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना पृथ्वीवर आणण्यासाठी स्पेसएक्सचे ड्रॅगन अंतराळयान स्पेस स्टेशनवर दाखल झाले. दरम्यान, 18 मार्च रोजी भारतीय वेळेनुसार, 10:35 वाजता अंतराळयान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापासून वेगळे करण्यात आले आणि त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला. यानंतर आज पहाटे 2 वाजून 41 मिनिटांनी डॉऑर्बिट बर्न अर्थात वातावरणात यानाचा प्रवेश झाला. दरम्यान, आज 19 मार्च रोजी सकाळी साडे तीन वाजेच्या सुमारास स्पॅशडाऊन अर्थात फ्लोरिडा किनाऱ्यावरील समुद्रात स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सुलचे लँडिग झाले आणि सुनिता विल्य्म्स आणि बुच विल्मोर या दोघांचे सुखरूपणे पृथ्वीवर आगमन झाले. यासोबतच क्रू-9 अंतराळवीर निक हेग, अलेक्झांडर गोर्बुनोव्ह ड्रॅगन हे देखील परतीच्या प्रवासात त्यांच्यासोबत होते.
आता पुढे काय होणार? –
सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर परत परतल्यानंतर भारतासह जगभरात मोठा आनंद व्यक्त केला जात आहे. आता या यशस्वी लँडिंगनंतर, मिशननंतरच्या नियमित वैद्यकीय तपासणीसाठी क्रू काही दिवसांसाठी नासाच्या जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये पाठवले जाणार आहेत. यातसेच स्पेस स्टेशनमध्ये दीर्घ काळ घालवल्याने त्यांना एकाकीपणाच्या मानसिक आव्हानांव्यतिरिक्त, हाडे आणि स्नायू खराब होणे, दृष्टी कमी होणे अशा रोजच्या जगण्यासंदर्भात देखील अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.
हेही वाचा : Success Story : बालपणी आई-वडिलांचं निधन, मामांकडे पुर्ण केलं शिक्षण अन् आता झाला क्लास-2 ऑफिसर