• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोऱ्यात दुष्काळी पंचनामे अंतिम टप्प्यात; येत्या दोन दिवसांत काम पूर्ण करण्याचे नियोजन, तहसीलदार विजय बनसोडे यांची माहिती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 10, 2026
in पाचोरा, ताज्या बातम्या
पाचोऱ्यात दुष्काळी पंचनामे अंतिम टप्प्यात; येत्या दोन दिवसांत काम पूर्ण करण्याचे नियोजन, तहसीलदार विजय बनसोडे यांची माहिती

पाचोरा, 10 ऑक्टोबर: राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, पाचोरा-भडगाव तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीची नोंद करण्यासाठी महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त यंत्रणेमार्फत पंचनामे सुरू आहेत. पाचोरा तालुक्यात आतापर्यंत सुमारे 60 ते 70 टक्के पंचनामे पूर्ण झाले असून, उर्वरित काम येत्या दोन दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार विजय बनसोडे यांनी दिली.

प्रशानाकडून पंचनाम्यांचे काम सुरू –

दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान निश्चित करण्यासाठी महसूल प्रशासनाकडून प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामे केले जात आहेत. या प्रक्रियेत तलाठी, कोतवाल आणि कृषी सहायक सहभागी आहेत. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतातील गटाचा पंचनाम्यात समावेश व्हावा, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. कोणताही शेतकरी किंवा त्याचे क्षेत्र पंचनाम्यापासून वंचित राहू नये, यावर भर दिला जात आहे.

सध्या पंचनाम्यांचे काम वेगाने सुरू असून, बहुतांश क्षेत्रातील नोंदणी पूर्ण झाली आहे. उर्वरित पंचनामे दोन दिवसांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या कामाचा वरिष्ठ स्तरावरून सातत्याने आढावा घेतला जात असून दुष्काळी पंचनाम्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

– विजय बनसोडे (तहसीलदार, पाचोरा)

पंचनाम्यांमध्ये सर्वच क्षेत्रांचे नुकसान सारखे गृहीत न धरता प्रत्यक्ष परिस्थितीनुसार नोंद केली जाणार आहे. जिरायत क्षेत्रात पिकांचे मोठ्या प्रमाणावर, अगदी ९० ते १०० टक्क्यांपर्यंत नुकसान झालेले असू शकते; तर बागायत क्षेत्रात नुकसानीचे प्रमाण तुलनेने कमी असू शकते. अशा परिस्थितीत कृषी सहायकांच्या मदतीने नुकसानीचे मूल्यांकन करून त्यानुसार नोंद केली जाणार असल्याचे तहसीलदार विजय बनसोडे यांनी स्पष्ट केले.

पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य –

दुष्काळी परिस्थितीत पिकांच्या नुकसानीसोबतच पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचे नियोजनही प्रशासनासमोर महत्त्वाचा विषय आहे. राज्याचे महसूलमंत्री तथा दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार, धरणांमध्ये उपलब्ध असलेले पाणी सर्वप्रथम पिण्याच्या गरजेसाठी आरक्षित करण्यावर भर देण्यात आला आहे.

नुकतीच पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पाचोरा येथे झालेल्या बैठकीत तालुक्यातील चारा उपलब्धता आणि भविष्यातील नियोजनाचा आढावा घेण्यात आला. सध्याच्या नियोजनानुसार पाचोरा तालुक्यात जनावरांसाठी साधारणतः १५५ दिवस पुरेल एवढा चारा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात चाऱ्याची उपलब्धता टिकवून ठेवण्यासाठी रब्बी हंगामातील क्षेत्र आणि त्यातून मिळणाऱ्या चाऱ्याचाही विचार केला जात असल्याची माहिती तहसीलदार बनसोडे यांनी दिली.

जनावरांच्या चाऱ्याबाबत प्रशासनाचे नियोजन सुरु –

पाचोरा तालुक्यात साधारणतः १८ ते २० हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगाम घेतला जातो. मात्र, यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे रब्बीचे क्षेत्र घटून सुमारे १५ हजार हेक्टरपर्यंत राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या क्षेत्रातून उपलब्ध होणारा चारा पुढील दोन ते तीन महिने, म्हणजे मे-जूनपर्यंत पुरेल, असा अंदाज बैठकीतील नियोजनानुसार व्यक्त करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या एकूण परिस्थितीचा विचार करता जनावरांसाठी साधारणतः सहा महिन्यांचा चारा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.

पाचोरा तालुक्यात सद्यस्थितीत सुमारे 91 हजार 508 इतकी एकूण पशुधनाची संख्या आहे. तालुक्यात सध्या उपलब्ध असलेला कडबा, कुटार आणि इतर चारा हा आगामी मार्च महिन्यापर्यंत पूर्णपणे पुरेल. पशुपालकांनी उपलब्ध चाऱ्याचा अपव्यय न करता त्याचे योग्य नियोजन करावे.

– डॉ. अंकुश धोंड (पशुसंवर्धन व दुग्धविकास अधिकारी, पाचोरा)

हेही वाचा: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन; पुण्यातील डोणजे गावात शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार

बातमी शेअर करा !
Share
Tags: Droughtdrought damage assessmentspachora newssuvarna khandesh livetehsildar vijay bansode

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्यात दुष्काळी पंचनामे अंतिम टप्प्यात; येत्या दोन दिवसांत काम पूर्ण करण्याचे नियोजन, तहसीलदार विजय बनसोडे यांची माहिती

पाचोऱ्यात दुष्काळी पंचनामे अंतिम टप्प्यात; येत्या दोन दिवसांत काम पूर्ण करण्याचे नियोजन, तहसीलदार विजय बनसोडे यांची माहिती

October 10, 2026
जळगाव जिल्ह्यात चारा साक्षरता व संवर्धन अभियानाचा पहूर येथून शुभारंभ

जळगाव जिल्ह्यात चारा साक्षरता व संवर्धन अभियानाचा पहूर येथून शुभारंभ

October 9, 2026
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन; पुण्यातील डोणजे गावात शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन; पुण्यातील डोणजे गावात शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार

October 9, 2026
मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

October 8, 2026
महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांकडून अमित शाह यांना माहिती; केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी

महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांकडून अमित शाह यांना माहिती; केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी

October 7, 2026
Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषद येथे शिक्षक समायोजन व पदस्थापना प्रक्रिया यशस्वी

Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषद येथे शिक्षक समायोजन व पदस्थापना प्रक्रिया यशस्वी

October 7, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page