मुंबई, 5 नोव्हेंबर : महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून विविध प्रकारच्या 2400 आजारांसाठी मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून 2399 आजारांसाठी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार होणार आहेत. तर, ज्या काही गंभीर आजारांसाठी अधिकचा खर्च होत असून त्यात 10 लाख रुपये देण्याचा निर्णयही शासनाने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
राज्यातील नागरिकांना आरोग्य सुविधा आणि चांगले उपचार व्हावेत यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचारांच्या यादीत सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. तसेच राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत शहरी आरोग्य आयुक्तालय स्थापन करण्यात येणार असून आरोग्य सुविधांचे विकेंद्रीकरणामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
यासोबतच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित पदावर समायोजन करण्याच्या निर्णयात दुरुस्तीस मान्यता देण्यात आली आहे. तसेच अभियानात 14 मार्च 2024 रोजी दहा वर्ष सेवा पूर्ण झालेल्या कंत्राटी कर्चाऱ्यांचे समकक्ष पदावर समायोजन करण्यात येणार आहे. सेवा प्रवेश नियमांत दुरूस्ती न एक वेळची बाब म्हणून समायोजन केले जाणार आहे. सार्वनजिक आरोगय विभागातील पदांबरोबर, ग्रामविकास विभागामार्फत भरण्यात येणारी आरोग्य सेवेतील रिक्त पदांबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.






