शिरपूर (प्रतिनिधी), 10 नोव्हेंबर : धुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा फत्तेपर कनगई येथे प्रभारी मुख्याध्यापिका या पदावर कार्यरत असेलल्या वरिष्ठ शिक्षिका सोनल प्रविणलाल शाह यांची जिल्हा परिषद केंद्र शाळा करवंद येथे सायन्स टिचर म्हणून पदोन्नती करण्यात आली आहे.
सोनल प्रवीणलाल शाह यांचे माहेर जळगाव जिल्ह्यातील अमळनेर हे असून सध्या त्या धुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद फत्तेपूर कनगई याठिकाणी त्या प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या या पदोन्नतीनंतर लवकर त्या जिल्हा परिषद केंद्र शाळा करवंद येथे सायन्स टिचर म्हणून पदभार स्विकारणार आहेत.
सेवेला 22 वर्ष पूर्ण –
वरिष्ठ शिक्षिका सोनल प्रविणलाल शाह यांची शिक्षिका म्हणून कारकिर्द ही सन 2001 मध्ये सुरू झाली होती. त्या नोव्हेंबर 2001 ते सप्टेंबर 2006 या कालावधीदरम्यान, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत होत्या. त्यानंतर सप्टेंबर 2006 ते मे 2011 या कालावधीदरम्यान, धुळे जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शिरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा जुनी सांगवी येथे तसेच यानंतर जिल्हा परिषद शाळा लौकी (शिरपूर तालुका) येथे मे 2011 ते मे 2018 या कालावधीदरम्यान त्यांनी सेवा बजावली.
यानंतर मे 2018 मध्ये त्यांची जिल्हा परिषद शाळा फत्तेपूर कनगई येथे बदली करण्यात आली होती. यानंतर त्यांची आता धुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद केंद्र शाळा करवंद येथे सायन्स टीचर म्हणून पदोन्नती करण्यात आली आहे. त्यांचे शिक्षण हे बीएस्सी बीएड झाले असून आतापर्यंत 22 वर्षं त्यांनी सेवा बजावली आहे. त्यांच्या या पदोन्नतीनंतर त्यांनी प्रशासनाचे आभार मानले आहे. भाषा, विज्ञान, सामाजिक शास्त्रा या विषयांसाठी सहावी सातवी आणि आठवीच्या वर्गासाठी शिक्षकांची पदोन्नती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, सोनल प्रवीणलाल शाह यांच्या पदोन्नतीनंतर त्यांचे अभिनंदन केले जात आहे.