सुनिल माळी, प्रतिनिधी
पारोळा, 15 मे : पारोळा तालुक्यातून शेततळ्यातील वाटरप्रूफ कागद चोरा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पारोळा तालुक्यातील यांच्या शेतात ही घटना घडली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे संपूर्ण घटना –
पारोळा तालुक्यातील हनुमंतखेडा येथील शेतकरी बापु हिरामण पाटील यांची शिरसमणी शिवारात शेती असून त्यांनी पाणी साठवूण ठेवण्यासाठी शेततळे तयार केले आहे. या शेततळ्यात वाटरप्रूफ प्लास्टिक कागद टाकलेला होता. तसेच या शेततळ्याच्या बाजूला एक विहिर आहे. दरम्यान, शेतकरी बापु पाटील हे नेहमीप्रमाणे त्या विहिरीतून पाणी काढण्यासाठी गेले असता विहीरीत शेततळ्याकडुन पाणी पाझरत होते.
यानंतर बापु पाटील यांनी शेततळ्याची पाहणी केली असता त्यामधील अर्धा प्लॉस्टीक पेपर हा कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी करण्याच्या व नुकसान करण्याच्या उद्देशाने फाडलेला दिसला. दरम्यान, त्या कागदाचा आजू-बाजूच्या शेतात शोध घेतला असता तो मिळून आला नाही. दरम्यान, बापु पाटील यांनी दिलेल्या, 15000 रूपये किमतीचा काळ्या रंगाचा टेक्सल कंपनीचा प्लॅस्टीकचा जाड कागद चोरीला गेल्याच्या तक्रारीवरून पारोळा पोलिसांत अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रदिप पाटील करीत आहेत.
हेही वाचा : Karan Pawar Interview : शिवसेना (उबाठा) उमेदवार करण पवार यांच्यासोबत विशेष संवाद.