ईसा तडवी, प्रतिनिधी
भडगाव – पाचोरा-भडगाव तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक किंवा राष्ट्रीयकृत बँक तर्फे शेतीसाठी पीक कर्ज घेऊन नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करावे, अशी मागणी आमदार किशोर पाटील यांच्याकडे करण्यात आली. शेतकऱ्यांनी या मागणीसाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांना नुकतेच याबाबतचे निवेदन दिले.
निवेदनात शेतकऱ्यांनी काय म्हटले –
दरम्यान, पीककर्जाच्या माफीसंदर्भात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले की, 2008 साली केंद्राच्या यूपीए सरकारने तसेच सन 2011 साली तत्कालीन सरकारने ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज थकीत होते, त्यांना कर्ज माफ केले. मात्र, कोणत्याही सरकारने दरवर्षी नियमित असणाऱ्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही. म्हणून सरकारने आता नियमित शेती पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, अशी स्थानिक शेतकऱ्यांनी केली.
यांची होती उपस्थिती –
दरम्यान, आमदार किशोर पाटील यांना निवेदन देताना साहेब पाटील (पांढरद), दिलीप पाटील (पांढरद), रघुनाथ पाटील (पांढरद), राजेंद्र सोनार (पाचोरा), राजेंद्र भावसार (पाचोरा), वसंत पाटील (पांढरद), भरत पाटील (वाणेगाव), पोलीस पाटील (मळगाव) यांची उपस्थिती होती.
हेही वाचा – puja khedkar case : पूजा खेडकरला ‘या’ तारखेपर्यंत अटक होणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं?