• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

अहमदाबाद विमान अपघात; एका क्षणात घडला अनर्थ अन् 242 जणांचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडंल?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 12, 2025
in देश-विदेश, ताज्या बातम्या
अहमदाबाद विमान अपघात; एका क्षणात घडला अनर्थ अन् 242 जणांचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडंल?

अहमदाबाद, 12 जून : गुजरातच्या अहमदाबादमध्ये विमान अपघाताची अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी दुर्घटना घडली. अहमदाबादहून आज दुपारी 242 प्रवाशांसह लंडनसाठी उड्डाण घेतलेलं हे विमान अचानक खाली कोसळलं अन् मोठा स्फोट झाला. दरम्यान, या स्फोटात विमान अपघाताता 242 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.  यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी तसेच महाराष्ट्रातील चार जणांचा समावेश होता.

अहमदाबाद विमान अपघाताची दुर्दैवी घटना –

मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे Boeing Dreamliner 171 विमानाने अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण केले होते. मात्र, दुपारी 1.38 वाजता केलेल्या उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांतच हे विमान खाली कोसळले. या दुर्घटनेनंतर काही वेळातच 3 अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि मोठ्या प्रमाणात कुलिंग ऑपरेशन राबविण्यात आले. तसेच एनडीआरएफचे पथक आणि प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले.

विमानात 169 भारतीय नागरिक तर 53 ब्रिटिश नागरिक –

अहमदाबादहून दुपारी 1 वाजता निघालेल्या या विमानात बोईंग 171 विमानात दोन पायलट, 230 प्रवासी आणि 10 क्रू मेंबर्स होते. यामध्ये 169 भारतीय नागरिक तर 53 ब्रिटिश नागरिक होते. 1  कॅनेडियन नागरिक आणि 7 पोर्तुगीज नागरिक होते. अहमदाबादहून लंडनला जाण्यासाठी विमानाने उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही क्षणातच विमान कोसळले. ज्यामुळे हा दुर्दैवी अपघात घडला.

विमान अपघातात 242 जणांचा दुर्दैवी मृत्यू –

अहमदाबादहून दुपारी 1 वाजून 31 मिनिटांनी विमानाने लंडनसाठी उड्डाण केल्यानंतर अवघ्या 7 मिनिटात हे विमान कोसळले. विमानाने हवेत टेक ऑफ केल्यानंतर जवळच असलेल्या मेघानी नगर  या दाट लोकवस्तीच्या भागात बी.जे. मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहावर जाऊन हे विमान कोसळले. विमान दुर्घटनेची माहिती समोर येताच विमानातील प्रवाशांसाठी प्रार्थना होऊ लागल्या. मात्र, दुर्घटनेचा व्हिडिओ पाहून मनात जी शंका न राहून होती होती, अखेर तेच घडले. एअर इंडियाच्या विमानाच्या झालेल्या अपघातात 242 जणांचा दुर्घटनेत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. विमान दुर्घटनेच्यावेळी बी.जे. मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहात असलेले काही डॉक्टर्स जखमी झाले आहेत.

उच्चस्तरीय चौकशी होणार –

अहमदाबादहून लंडनला म्हणजे दूर मार्गावर जाणार असल्याने या विमानात इंधन देखील मोठ्या प्रमाणात भरण्यात आले होते. ज्यावेळी विमान क्रॅश झाले तेव्हा विमानाने पेट घेतला.  त्यामुळे त्याठिकाणी धुराचे मोठे लोळ पसरल्याचे दिसून आले. तर दुसरीकडे विमानाने टेक ऑफ केल्यानंतर विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या विमान अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार आहे.

टाटा ग्रुपकडून 1 कोटी रुपयांची मदत जाहीर –

अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारत आणि सामाजिक जाणीव ठेऊन टाटा ग्रुपने विमान दुर्घटनेसंदर्भात मोठी घोषणा केली. या विमान दुर्घटनेत जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आल्याचे टाटा ग्रुपकडून सांगण्यात आले आहे. तसेच जखमींचा वैद्यकीय खर्च देखील टाटा ग्रुपकडूनच करण्यात येणार असून आवश्यक ती सर्व काळजी आणि मदत जखमींना मिळेल, असे टाटा ग्रुपने म्हटले आहे. यासोबतच विमान अपघातात कोसळलेल्या अहमदाबादमधील बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या बांधकामात मदत करण्याचे आश्वासनही टाटा ग्रुपचे प्रमुख एन. चंद्रशेखरन यांच्याकडून देण्यात आले आहे.


गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा मृत्यू –

अहमदाबाद विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. ते आज विमानाने लंडनला निघाले होते. दरम्यान, विमानाने टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या काही क्षणातच ते खाली कोसळले. यामध्ये 242 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांची देखील यामध्ये समावेश होता. विजय रूपाणी यांनी ऑगस्ट 2016 ते सप्टेंबर 2021 पर्यंत गुजरातचे 16 वे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते.

मृतांमध्ये महाराष्ट्रातील चौघांचा समावेश –

अहमदाबाद विमान अपघातात महाराष्ट्रातील 4 चार क्रू मेबर्सं होते. यामध्ये कॅप्टन सुमित पुष्कराज सभ्रवाल यांच्यासह आणखी 3 क्रू मेंबर्स हे महाराष्ट्रातील रहिवाशी होते. तसेच सुमित पुष्काराज आणि अर्पण महाडिक हे दोघे मुंबईत वास्तव्यात होते. तर दीपक पाठक हे बदलापूरचे आणि रोशनी सोनघरे ह्या डोंबिवलीच्या होत्या. दरम्यान, या दुर्घटनेत 4 मराठमोळ्या क्रू मेंबर्संना आपला जीव गमवावा लागलाय. दरम्यान, त्यांचा दुर्दैवी अंत झाल्याने कुटुबीयांवर व मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा : जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस; तिघांचा मृत्यू, 21 घरांचे नुकसान, पंचनामे सुरू

बातमी शेअर करा !
Share
Tags: ahmedabad airportahmedabad plane crashair indiamarathi newsplane crashplane crash incidentsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विमान अपघातानंतर पंतप्रधान अहमदाबादमध्ये पोहोचले; पीएम मोदी यांच्या आजच्या दौऱ्यातील तीन महत्वाचे मुद्दे

विमान अपघातानंतर पंतप्रधान अहमदाबादमध्ये पोहोचले; पीएम मोदी यांच्या आजच्या दौऱ्यातील तीन महत्वाचे मुद्दे

June 13, 2025
अहमदाबाद विमान अपघात; एका क्षणात घडला अनर्थ अन् 242 जणांचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडंल?

अहमदाबाद विमान अपघात; एका क्षणात घडला अनर्थ अन् 242 जणांचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडंल?

June 12, 2025
Pachora Taluka News : पाचोरा तालुक्यातील बांबरूड (रा.) येथे वादळी पावसामुळे केळी-मोसंबी बागांचे नुकसान

Pachora Taluka News : पाचोरा तालुक्यातील बांबरूड (रा.) येथे वादळी पावसामुळे केळी-मोसंबी बागांचे नुकसान

June 13, 2025
“माझ्या 25 वर्षांच्या इतिहासात मतदारसंघात असं वादळ पाहिलं नाही; तात्काळ शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी 100 टक्के प्रयत्नशील” – आमदार किशोर आप्पा पाटील

“माझ्या 25 वर्षांच्या इतिहासात मतदारसंघात असं वादळ पाहिलं नाही; तात्काळ शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी 100 टक्के प्रयत्नशील” – आमदार किशोर आप्पा पाटील

June 12, 2025
मोठी बातमी! अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात प्रवासी विमान कोसळलं; लंडनसाठी उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही क्षणातच अपघात

मोठी बातमी! अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात प्रवासी विमान कोसळलं; लंडनसाठी उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही क्षणातच अपघात

June 12, 2025
कजगावकरांच्या मागणीला यश, बडनेरा-नाशिक मेमो गाडीला थांबा, खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते हिरवा झेंडा

कजगावकरांच्या मागणीला यश, बडनेरा-नाशिक मेमो गाडीला थांबा, खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते हिरवा झेंडा

June 12, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page