नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर : संपुर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र तसेच झारखंड या दोन राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या घोषणेसाठी आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. दरम्यान, या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आल्यानंतर आजपासून आचारसंहिता लागू होणार आहे.
निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद –
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र तसेच झारखंडच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषदेच्या आयोजनाबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. आज दुपारी साडे तीन वाजता दिल्लीतील विज्ञान भवनात ही पत्रकार परिषद पार पडणार आहे. यामध्ये महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात येणार आहे. दरम्यान, निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्यात आजपासून आचारसंहिता लागू होणार आहे.
निवडणुकीच्या घोषणेनंतर आचारसंहिता –
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपणार असून त्यापूर्वी राज्यात नवी विधानसभा अस्तित्वात येणे आवश्यक आहे. त्यानुसार, आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत निवडणुकीची घोषणा होणार आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकीची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यात आचारसंहिता लागणार आहे.
हेही वाचा : Breaking : दिवाळीतील हंगामी भाडेवाढ रद्द, एसटी महामंडळाचा मोठा निर्णय