पारोळा, 15 फेब्रुवारी : पारोळा-कजगाव रस्त्यावरील वाकड्या पुलाखाली एका अज्ञात महिलेने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. दरम्यान, या महिलेची ओळख पटलेली असून या महिलेचे नाव कविता राजू मोरे (वय 48, रा. सोनार नगर, कजगाव रोड, पारोळा) असे आहे तर त्यांचे पती राजू उत्तम मोरे हे तालुक्यातील बोळे येथील महाराणा प्रताप विद्यालयात मुख्याध्यापक आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कजगाव रस्त्यावरील वाकड्यापुलाखाली एका अज्ञात महिलेने स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेत आत्महत्या केली होती. बोळे येथील महाराणा प्रताप विद्यालयातील मुख्याध्यापक राजेंद्र उत्तम मोरे (रा. देवगाव हल्ली मु. सोनार नगर, आकाळ मॉलच्या मागे पारोळा) यांच्या त्या पत्नी होत्या. तर त्यांना एक मुलगा हरीश (वय 15), मुलगी हेमांगी (वय 15), असे जुडवा मुले आहेत. संबंधित महिलेला मानसिक समस्या असल्या कारणाने त्यांच्यावर धुळे येथील मानसोपचार तज्ञ डॉ.प्रवीण साळुंखे यांचेकडे 2017 पासून उपचार सुरू होते.
‘अशी’ पटली ओळख –
आत्महत्या केलेल्या महिलेचे पती राजेंद्र मोरे आणि भाऊ सागर सिताराम (न्याहळोद ता. जि. धुळे) यांनी पोलिसांत दिलेल्या जबाबानुसार, मंगळवारी राजू मोरे हे जळगावात गेले होते. तर त्यांची मुलेदेखील बाहेर होती. घरात कविता मोरे एकट्याच होत्या. दरम्यान, त्यांनी वाकड्या पुलाजवळ जाऊन अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतले. दरम्यान, मी जळगाववरून पारोळा घरी आलो असता तिच्या तपास केला असल्याने ती मिळून आली नाही.
म्हणून मला एका महिलेने वाकड्या पुलाजवळ जाळून घेतल्याचे समजल्यानंतर मी पारोळा कुटीर रुग्णालय येथील शवविच्छेदन गृहात ठेवलेल्या शवजवळ गेलो आणि तिच्या हातावर गोंदलेले फुल, पायातले बेले, साडी वगैरे वरून ओळख पटली.
काय आहे संपूर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा-कजगाव रस्त्यावरील वाकड्या पुलाजवळ भोसले पोल्ट्रीफार्म शेजारी एका 35 ते 40 वयाच्या महिलेने बिसलेरीच्या बाटलीमध्ये पेट्रोल आणून दगडावर बसून स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली होती. तिच्या अंगावर लाल कलरची साडी, गळ्यात मंगळसूत्र, पायात चप्पल अशी सुशिक्षित घराण्यातील महिला असल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसून आले होते. दरम्यान, या महिलेची ओळख पटलेली असून याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा : धक्कादायक, स्वतःला पेटवून घेत महिलेची आत्महत्या, पारोळा शहरातील घटना