पारोळा, 13 फेब्रुवारी : पारोळा शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पारोळा-कजगाव रस्त्यावरील वाकड्या पुलाखाली महिलेने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना आज संध्याकाळी घडली. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत पुढील तपास सुरू केला आहे.
काय आहे संपूर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा-कजगाव रस्त्यावरील वाकड्या पुलाजवळ भोसले पोल्ट्रीफार्म शेजारी एका 35 ते 40 वयाच्या महिलेने बिसलेरीच्या बाटलीमध्ये पेट्रोल आणून दगडावर बसून स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तिच्या अंगावर लाल कलरची साडी, गळ्यात मंगळसूत्र, पायात चप्पल अशी सुशिक्षित घराण्यातील महिला असल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसून आले. दरम्यान, ही महिला पारोळा शहरातील आकाश मॉल मागील भागातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनास्थळी पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे, किशोर भोई व कर्मचारी यांनी पंचनामा केला. पारोळा पोलीस स्टेशनला प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदर महिलेने आणलेली पेट्रोलची बाटली तसेच कपड्याचे नमुने व चप्पल ताब्यात घेतले असून पुढील तपास पारोळा पोलिस करीत आहेत.
हेही वाचा : nandurbar news : अयोध्याकडे जाणाऱ्या आस्था एक्सप्रेसवर दगडफेकीचा प्रवाशांना संशय, नेमकं काय घडलं?