जळगाव, 19 जानेवारी : जळगावमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करून त्याचा व्हिडिओ तयार केला. तसेच तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 30 हजार रूपयांची खंडणी मागितल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चौघा संशायितांविरोधात पोक्सो व खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिस उपधीक्षक संदिप गावित यांनी गुरूवारी दिली.
नेमकं काय आहे प्रकरण? –
जळगाव शहरातील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाची काही महिन्यांपूर्वी स्विमिंग शिकत असताना संशियतांसोबत ओळख झाली होती. त्यानंतर 17 जानेवारी रोजी संशयितांनी पीडित मुलाला खान्देश कॉम्पेलेक्स परिसरात नेत त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य करून त्याचा व्हिडिओ बनवला. संशयितांनी पीडित मुलाकडे 30 हजारांच्या खंडणीची मागणी केली. मुलाकडून क्युआर कोडद्वारे दोनवेळा रक्कमही घेतली.
परंतु तरीही आरोपींची मागणी वाढत असल्याने पीडित मुलाने वडिलांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तिघांना अटक केली असून चौथा संशयित फरार आहे, अशी माहिती पोलिस अधिकारी संदिप गावित यांनी दिली.
तिघांना अटक, एक फरार –
शहर पोलीस ठाण्याचे पो. नि. अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि किशोर पवार, पोहेकों भास्कर ठाकरे, प्रफुल्ल धाडे, अमोल ठाकूर यांनी अवघ्या काही तासात सोनू उर्फ बंटी रुपेश प्रभू बनसोडे (वय 19, रा. इंद्रप्रस्थनगर), सुरज गणेश परदेशी (वय 21, रा. त्रिभूवन कॉलनी) व अजय लक्ष्मण गरुड (वय 40, रा. गेंदालाल मिल) या तिघांना अटक केली तर त्यांचा एक साथीदार फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा : MPSC : राज्य सेवा मुख्य परिक्षेचा निकाल जाहीर, विनायक पाटील राज्यातून पहिला तर पूजा वंजारी मुलींमधून पहिली