अमळनेर, 12 एप्रिल : अमळनेर शहरासह तालुक्यात वादळी पावसासह गारपीट झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे अमळनेर तालुक्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांचा उघड्यावर पडलेला मालाची देखील नासधूस झाली आहे.

अमळनेरमध्ये अवकाळी पाऊस –
अमळनेर शहरासह तालुक्यात आज संध्याकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे तर काही ठिकाणी गारपीठ झाल्याची माहिती समोर आली आहे. अमळनेरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने शहरातील झाडे रस्त्यावर उन्मळून पडली. परिणामी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांच्या वाहुतकीस अडथळा निर्माण झाला. तसेच सोसाट्याचा वाऱ्यामुळे रस्त्यावरचे होर्डींग्स अस्ताव्यस्त झाले.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान –
चोपडा रस्त्यावरील गजानन महाराज मंदिरा शेजारी असलेले झोपडपट्टी पूर्णतः उध्वस्त झाली. अमळनेर तालुक्यातील अंतुर्ली, रंजाने, इत्यादी भागात झाडे पडलेली आहेत. तसेच चांदणी कुऱ्हे रस्त्यावरही झाडे उल्मडून पडले आहेत. दरम्यान, अमळनेर तालुक्यात या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून बाजरी, मका इ.पिकांचे नुकसान झाले आहे.
हेही वाचा : पाचोरा तालुक्यासह जळगाव ग्रामीणमध्ये जोरदार पावसाची हजेरी, उकाड्यापासून दिलासा