भडगाव, 26 जानेवारी : भडगाव येथील वीरमाता लयाबाई सोनवणे यांना आज पालकमंत्री गुलाबराव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 73 वा वर्धापन दिन सोहळा आज उत्साहात साजरा झाला. यावेळी जळगाव येथे झालेल्या या सोहळ्यात वीरमातेला सन्मानित करण्यात आले.
वीर जवान निलेश रामभाऊ सोनवणे (मु.ता.भडगाव) हे दिनांक 10 जुलै 2021 रोजी जम्मू-कश्मिर मधील नियंत्रण रेषेजवळील क्षेत्रात झालेल्या युद्धजन्य तणावाच्या परिस्थितीत कर्तव्य बजावत असतांना धरातार्थी पडले आणि कर्तव्य बजावत असतांना त्यांना वीरमरण आले. वीर जवान निलेश सोनवणे यांच्या पश्चात त्यांचे वारसदार लयाबाई सोनवणे वीरमाता यांना तांब्रपट देवून सन्मानित करण्यात आले. सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्यतर्फे त्यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते तांब्रपट देवून सन्मानित करण्यात आले.
तसेच यावेळी मगर रमेश साहेबराव 231 BnCRPF यांना 1 जुन, 2018 देशांतर्गत सुरक्षा संबंधी मोहिमेत कोंडापारा, आरनपुरा, पोलीस स्टेशन, दंतवाडा, छत्तीसगड येथील जंगल क्षेत्रात माओवाद्यांनी केलेल्या आ.ई.डी. विस्कोटात डावा पाय व हाताला गंभीर जखमी होऊन गुडघ्यापासून खाली डावा पाय काढण्यांत आल्यामुळे 73 टक्के अपंगत्व आले. आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र सरकार तर्फे तांब्रपट देवून त्यांनाही सन्मानित करण्यात आले.
हेही वाचा – समन्वयातून समाजाच्या प्रगतीसाठी कटीबद्ध होऊया, मंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन
मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पार पडल्यानंतर पालकमंत्री श्री. पाटील यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक व मान्यवरांना त्यांच्या जागेवर जाऊन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्र्यांना पोलीस दलामार्फत मानवंदना देण्यात आली.