ईसा तडवी, प्रतिनिधी
भडगाव, 27 ऑगस्ट : माजी आमदार दिलीप वाघ यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात आमदार किशोर पाटील यांच्यावर टीका केली होती. दरम्यान, या टीकेला प्रत्त्युत्तर देत मार्केट कमिटीच्या प्रशासकपदी माझ्या माध्यमातून निवड केली असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले होते. यावरूनच दिलीप वाघ यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत आमदार किशोर पाटील यांना आव्हान दिले होते. दरम्यान, काल भडगावात आयोजित केलेल्या शेतकरी संवाद मेळाव्यात आमदार किशोर पाटील यांनी दिलीप वाघ यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.