राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनाचा आज दुसऱ्या आठवड्यातील दुसरा दिवस होता. दरम्यान, दुसऱ्या दिवशी ड्रीम 11, जंगली रमी ऑनलाईन सट्ट्याचा मुद्दा गाजला. आमदार किशोर जोरगेवार यांनी हा मुद्दा उपस्थित करत कडक कायदा करण्याची मागणी केली. यावर महाराष्ट्रात सध्यास्थितीत असा कुठलाही कायदा अस्तित्वात नाहीये. पण येत्या काळात यावर काम सुरू असून राज्याचे मुख्यमंत्र्यांनी स्वतः देशाच्या गृहमंत्र्यांना कडक कायदा करण्यासाठी पत्र असल्याचे राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले.