संदीप पाटील, प्रतिनिधी
पारोळा, 6 जुलै : पारोळा तालुक्यातील विचखेडे येथील विजय रंगराव निकम यांची महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना 615 च्या राज्य संघटक पदावर निवड करण्यात आली आहे. आपण संघटना वाढीसाठी सक्रीय सहभाग नोंदवून लिपिकांच्या प्रश्नासाठी काम करावे. लिपिक वर्गीय कर्मचा-यांचे हित लक्षात घेता जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचा-यांचे काम जोमाने कराल, असे नियुक्ती पत्रात नमूद केलंय.
विजय निकम यांना संघटनेचे राज्य अध्यक्ष मारूती जाधव आणि राज्यसचिव अरूण जावकर यांनी नियुक्तीपत्र दिलंय. दरम्यान, त्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेचे बापू कुलकर्णी, मार्गदर्शक तथा भा. राजाध्यक्ष मारूती अंकुश जाधव, सचिव अरुण जोर्वेकर, कोषाध्यक्ष उमाकांत सुर्यवंशी, राज्यसमन्वयक सागर बाबर, राज्यसंघटक जितेंद्र देसाई, कार्याध्यक्ष एस. एस. राऊत, कार्याध्यक्ष सचिन मगर, कार्याध्यक्ष संजय धोटे, उपाध्यक्ष पंकज गुल्हाने, मंत्रायल संपर्क प्रमुख सातलिंग स्वामी, मंत्रालय संपर्क प्रमुख प्रकाश महाळुगे, खजिनदार अतुल वैष्ण यांच्यासह सदस्य वनराज पाटील, नागेश सांगळे यांनी अभिनंदन केले.
हेही वाचा : मोठी बातमी! नाशिकमध्ये एसीबीचा ट्रिपल धमाका, एकाच दिवशी तीन लाचखोरांना पकडले रंगेहाथ