ईसा तडवी, प्रतिनिधी
लासगाव (पाचोरा), 13 मे : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात चौथ्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. यामध्ये जळगावसह राज्यातील एकूण 11 लोकसभा मतदारसंघांचा समावेश होता. दरम्यान, पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे नागरिकांनी लोकशाहीच्या उत्साहाला भरभरून प्रतिसाद दिल्याने मतदानाची प्रक्रिया उत्साहात पार पडली.
लासगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आज सकाळी 7 वाजेपासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडली. लासगावातील जिल्हा परिषदेत शाळेत असलेल्या बुथ क्रमांक 154 आणि 155 यामध्ये एकूण मतदान 1471 इतके झाले. यावेळी गावातील जास्तीत जास्त नागरिकांनी सकाळच्या सत्रात मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्राच्या परिसरात मंडप टाकण्यात आला होता. दरम्यान, मतदान केंद्रावर कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
लासगाव येथील जिल्हा परिषद शाळेत मतदान प्रक्रिया पार पडण्यासाठी धनंजय आर. चौधरी, संदीप रमेश पाटील, रजनीकांत नवल भामरे, नरेंद्रसिंग डी पाटील, किरण शिरसाठ, संगिता नंदकिशोर खैरनार, वासुदेव हरीभाऊ मारवळकर, अब्दुल रहिम, स्वप्निल भालेराव, भारती बाविस्कर, धनंजय आर चौधरी, पद्माकर पाटील यांची उपस्थिती होती.
यावेळी सरपंच समाधान पाटील, पोलीस पाटील पंजाबसिंग दंगल पाटील, अंगणवाडी सेविका माया सुनिल पाटील, अरूणा राजेंद्र तायडे, कमलबाई झुंबरसिंग पाटील, मदतनीस सरला पंडित तायडे, तिरूणा धोंडू सुर्यंवशी, आरीफा बी. शेख सादीक, आशा स्वयंसेविका विद्या लोटन धनगर, संगीता मंगल धनगर, एनसीसी कॅडेट लोकेश पुंडलिक बडगुजर, एनसीसी कॅडेट गौरव विजय पाटील, ग्रामपंचायत शिपाई राजेंद्र बडगुजर, अवि विजय पाटील, परमेश्वर पाटील, भूषण पाटील, शुभम महाजन, राजेंद्र पाटील, उर्मिला पराग पाटील, संगीता प्रविण पाटील, सुवर्णा रविंद्र पाटील, पराग बाबुलाल पाटील, करणसिंग पाटील, हारूण मिस्तरी, तुळशीराम राजधर पाटील, आदी उपस्थित होते. दरम्यान, या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन आणि ग्रामपंचायत सदस्यांसह गावातील नागरिकांचे सहकार्य लाभले.
हेही वाचा : Karan Pawar Interview : शिवसेना (उबाठा) उमेदवार करण पवार यांच्यासोबत विशेष संवाद.