ईसा तडवी, प्रतिनिधी
लासगाव (पाचोरा), 4 सप्टेंबर : खान्देशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबारात गेले दोन-तीन दिवस मुसळधार पाऊस झाला असून धरणांमधील जलसाठ्यांत वाढ झाली आहे. दरम्यान, पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे मुसळधार पाऊसामुळे 2 सप्टेंबर रोजी रात्री दोन विहीर धसल्या असून एक मातीचे घर कोसळलंय.
काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील लासगाव परिसरातील भगतसिंग शाहसिंग पाटील आणि सचिन रमेश पाटील यांच्या मालकीच्या दोन विहीर धसल्या आहेत. तसेच सुरेश रामदास पाटील यांच्या मालकीचे घर कोसळले. सदर मातीचे घर हे पडक्या अवस्थेत असताना काही दिवसांपुर्वीच त्याठिकाणी असलेला रहिवास काढण्यात आला होता. असे असताना ते घर कोसळल्याने सुदैवाने त्याठिकाणी जीवितहानी टळली.
शासनाकडून मदतीची मागणी –
मुसळधार पावसामुळे शेतातील विहीर धसल्याने दोघे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी तलाठी यांच्यासोबत संपर्क करत शासनाकडून योग्य ती मदत मिळावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजने तलाठी दिपक दवंगे यांच्यासोबत संपर्क साधला.
तलाठी काय म्हणाले? –
यावेळी तलाठी दिपक दवंगे यांनी सांगितले की, लासगाव गावातील विहीर कोसळल्याच्या घटनेची दखल घेत घटनास्थळावरचा पंचनामा करण्यात आला आहे. तसेच याबाबतची माहिती शासनाकडे पाठवली जाणार आहे. यानंतर ज्यावेळी शासनाकडून मदतीसंदर्भातील निधी मंजूर होईल, त्यावेळी संबंधित शेतकऱ्यांचे बँक खात्याचे नंबर घेऊन शासनाकडे पाठवले जातील. दरम्यान, संबंधित शेतकऱ्यांना मदत मिळावी, हाच आमचा प्रयत्न असल्याचेही दवंगे यांनी सांगितले.
हेही वाचा : Unmesh Patil Interview : ‘एकतर नार-पार नाहीतर हद्दपार…’, उन्मेश पाटील यांची Exclusive मुलाखत